सोयगावचे संदीप इंगळे शिवशंभू राज्यस्तरीय गौरव पुरस्काराने सन्मानित--



दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.19 -  शहरातील संदीप रामदास इंगळे यांना वीर शिवशंभू संघटना महाराष्ट्र राज्य आयोजित राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त दिला जाणारा 


शिवशंभू राज्यस्तरीय गौरव पुरस्काराने सोयगाव येथील सामाजिक कार्यकर्ते व गो सेवक संदीप इंगळे यांना दि.19 रविवारी ना.गो.नांदापुरकर सभागृह मराठवाडा साहित्य परिषद सन्मित्र कॉलनी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पुरस्कार सोहळा कार्यक्रमात माँसाहेब जिजाऊ यांचे वंशज शिवाजीराजे जाधव यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.यावेळी वीर शिवशंभू संघटना संस्थापक अध्यक्ष संभाजी पाटील, जालिंदर नागरे यांची प्रमुख उपस्थिती होती. संदीप इंगळे यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल अंजनाई गोशाळेचे सचिव दिलीप शिंदे, उपाध्यक्ष ईश्वर इंगळे, गो सेवक अप्पा वाघ, बाळू शिंदे, अनिल लोखंडे, अमोल निकम,दत्तू रोकडे,शाम पाटील,भगवान कोथलकर,अशोक ढगे,महेश मानकर,राम सोहनी, दिलीप सुरडकर,गणेश कापरे आदींनी अभिनंदन केले आहे.


Post a Comment

0 Comments