सोयगाव दि.18 - अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते.
यंदाही सोयगाव तालुका संप्रदाय सेवा समिती व सोयगाव शहर संप्रदाय सेवा समितीच्या वतीने दि.18 जानेवारी रोजी सोयगाव येथील ग्रामीण रुग्णालयात महारक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान सकाळीं नऊ वाजता जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन सामाजिक कार्यकर्ते व स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड राजेश गिरी यांच्याहस्ते करण्यात आले. त्यानंतर रक्तदान संकलनास सुरुवात करण्यात आली. दरम्यान रक्तदान महायज्ञास शिवसेना नेते (उबाठा) तथा जनतेच्या मनातील आमदार सुरेश बनकर यांनी भेट दिली .
यावेळी आमखेडा शिवसेना (उबाठा) शाखाप्रमुख गणेश कापरे यांनी शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला. रक्तदान महायज्ञात 261 रक्तदात्यांनी रक्तदान केले. सायंकाळी उशिरा पर्यंत रक्तदान महायज्ञ सुरू होता.रक्त संकलनाचे काम रेड प्लस रक्त पेढी जळगाव (खान्देश) यांनी केले.रक्तदान महायज्ञ यशस्वीतेसाठी सोयगाव तालुका संप्रदाय सेवा समिती व सोयगाव शहर संप्रदाय सेवा समितीच्या सेवेकऱ्यांनी परिश्रम घेतले.
0 Comments