टाकळीभान(प्रतिनिधी)—श्रीरामपूर एस टी आगारात सोमवार दि. २३ रोजी श्री क्षेत्र देवगड येथील मठाधिपती ह भ प भास्करगिरीजी महाराज यांचे उपस्थितीत श्री दत्त जयंती निमित्ताने महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला .
दरवर्षी बस स्थानकावरील मंदिरात गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांचे उपस्थितीत महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला जातो कर्मचारी व अधिकारी यांचे वर्गणी मधून महाप्रसाद अन्नदानाचे कार्य होत असते. यावेळी भास्करगिरीजी महाराज यांनी आयुष्यात एकदा तरी गुरुचरित्र पवित्र ग्रंथ वाचल्याने गुरु शिष्याचे नाते समजले जाते असे सांगून श्री दत्त मूर्ती ची पूजा अभिषेक करून प्रसादाची पूजा केली त्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करणे कामी श्री दत्त सेवा मंडळाचे अमोल पटारे, देविदास कहाणे, विष्णू गर्जे, सचिन कांबळे, गजानन घोडके, वाल्मीक राऊत, संजय गायकवाड, बबनराव जाधव यांनी सहकार्य केले.
0 Comments