राहुरी ( प्रतिनिधी)
राहुरी अवैध गौणखनिज प्रतिबंधक पथकाकडून प्रांताधिकारी श्री किरण सावंत पाटील आणि तहसीलदार नामदेव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध गौणखनिज कारवाया केल्या जात आहेत.
दि २४ डिसेंबर २०२४ रोजी मौजे मानोरी येथून अर्धा ब्रास वाळूसह ट्रॅक्टर जप्त करण्यात आला.दि २५ डिसेंबर २०२४ रोजी मौजे चिंचोली येथून अवैध वाळू उत्खनन करणारा ट्रॅक्टर यारीसह जप्त करण्यात आला तसेच मौजे राहुरी येथून अंदाजे १ ब्रास वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त करण्यात आला. गेल्या दोन दिवसांत ट्रॅक्टर वरील तीन कारवाया आणि जप्त यारी या माध्यमातून रुपये ३६२००० चा दंड राहुरी महसूल प्रशासनाकडून करण्यात आला.
0 Comments