शिर्डी (प्रतिनिधी) भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे माननीय न्यायमूर्ती श्री प्रसन्ना बी. वराळे दिल्ली यांनी बुधवार 25 डिसेंबर 2024 रोजी शिर्डीला भेट देऊन
श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. साईदर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी श्री साई मूर्ती व शाल देऊन सत्कार केला. यावेळी श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश अंजु एस. शेंडे उपस्थित होते.
न्यायमूर्ती प्रसन्ना भालचंद्र वराळे हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असताना त्यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती झाली.
न्यायमूर्ती प्रसन्ना बी. वराळे यांची 18 जुलै 2008 रोजी मुंबई उच्च न्यायालयात पदोन्नती झाली. त्यांनी 15 ऑक्टोबर 2022 रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला. 25 जानेवारी 2024 रोजी त्यांनी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली होती. न्यायमूर्ती वराळे यांनी
बुधवारी 25 डिसेंबर 24 रोजी त्यांनी शिर्डीला येत साई मंदिरात जाऊन साई समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या सुरक्षेसाठी मोठा बंदोबस्त तैनात होता.
0 Comments