शिर्डी (प्रतिनिधी) त्रिपुरा राज्याचे राज्यपाल महामहीम श्री एन इंद्रसेना रेड्डी यांनी 25 डिसेंबर 2024 बुधवार रोजी दुपारी सहकुटुंब शिर्डीला भेट दिली व श्री साईबाबांच्या मंदिरात जाऊन श्री साईबाबा समाधीचे मनोभावे दर्शन घेतले.
साई दर्शनानंतर श्री साई संस्थांनच्या वतीने संस्थांनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी त्यांचा शाल व श्री साई मूर्ती देऊन सत्कार केला.
नल्लू इंद्रसेना रेड्डी हे तेलंगणातील एक भारतीय राजकारणी होते . ते भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव होते . ते पूर्वी पक्षाच्या संयुक्त राज्य युनिटचे अध्यक्ष होते. इंद्रसेना रेड्डी हे 1983 मध्ये वयाच्या 33 व्या वर्षी पहिल्यांदा 3 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते, 1985 मध्ये हैद्राबादमधील मलकपेटमधून ते पुन्हा 1999 मध्ये निवडून आले होते. सध्या
एन इंद्रसेना रेड्डी त्रिपुराचे 20 वे राज्यपाल आहेत. त्यांनी हा
26 ऑक्टोबर 2023 रोजी पदभार स्वीकारला. तेव्हापासून ते आजतागायत त्रिपुराचे महामहीम राज्यपाल म्हणून काम करत आहेत. त्यांनी आज बुधवारी शिर्डीला भेट देऊन श्री साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी शासकीय अधिकारी तसेच त्यांच्या सुरक्षेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त होता.
0 Comments