शिर्डी (प्रतिनिधी) दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नाताळ सुट्टी निमित्त शिर्डीला साई भक्तांची मोठी गर्दी झाली असून पहाटेपासूनच साई नामाने साईनगरी दुमदुमून गेली आहे. तसेच शिंगवे तालुका राहता येथील दानशूर साई भक्त ओम साई इलेक्ट्रिकल्स अँड डेकोरेटर्स यांच्या वतीने श्री निलेश सुरेश नरोडे यांच्या मार्फत देणगीतून मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
दरवर्षी नाताळाची सुट्टी लागताच शिर्डीत साई भक्तांची गर्दी होत असते. यावर्षीही 25 डिसेंबर 2024 बुधवार रोजी नाताळ असल्याने आज पहाटेपासूनच शिर्डीत साई भक्तांची मोठी गर्दी झाली.नविन दर्शन रांग हाउसफुल झाली . साई दर्शनासाठी साई भक्तांनी रात्री व पहाटेपासूनच रांगेत उभे राहण्यास सुरुवात केली होती. साई संस्थांनच्या वतीने नवीन दर्शन रांगेत साई भक्तांना चहा ,कॉफी मोफत देण्यात येत होते. साईप्रसादालातही प्रसाद भोजन घेण्यासाठी साई भक्तांची तोबा गर्दी दिसून येत होती. विमान, रेल्वे, बस तसेच खाजगी प्रवासी वाहनांनी साईभक्त शिर्डीत येत होते. त्याचप्रमाणे सुमारे लहान-मोठ्या अनेक साई पालख्या, हजारो साई पदयात्री शिर्डीत साई दर्शनासाठी आले आहेत व येत आहेत. त्यामुळे साईनगरी साई नामाने दुमदुमून गेली आहे. शिर्डी येथे श्री खंडोबा मंदिर त्याचप्रमाणे श्री गुरुस्थान मंदिर ,श्री द्वारकामाई मंदिर ,श्री साई चावडी मंदिर तसेच लेंडी बाबतही साई भक्तांची मोठी गर्दी दिसून येत आहे. शिर्डीतील हॉटेल ,लॉज हाऊसफुल झाले आहेत. साई संस्थांनने श्री भक्तांसाठी आरोग्य, सुरक्षा, पिण्याचे पाणी, भोजनप्रसाद तसेच संस्थांनच्या परिसरात,
निवासस्थानांकडे जाण्यासाठी येण्यासाठी मोफत बस सेवा, माहिती सुविधा केंद्रे ,आदी सेवा सुविधा दिल्या जात आहे. गर्दीमुळे शिर्डीत सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे. एकूणच शिर्डीत नाताळ सुट्टी निमित्त आज बुधवारी दिवसभर साई भक्तांची मोठी गर्दी झाली. उद्या गुरुवार असून उद्याही साई भक्तांची गर्दी राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे साई संस्थांन
ने 29 डिसेंबर 2024 ते 1 जानेवारी 2025 या कालावधीत शिर्डी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे .त्या निमित्ताने विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. या कालावधीत सरत्या वर्षाला निरोप, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी साई दर्शनाला मोठ्या संख्येने साईभक्त येत असतात.
त्यामुळे साई भक्तांची शिर्डीत गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे. साई संस्थांनने साई भक्तांच्या निवासाची मंडप टाकून अतिरिक्त निवास व्यवस्था केली आहे. साई संस्थांनचे विद्यालय, महाविद्यालय, एन एस सी, आयटीआय विद्यार्थी या काळात साई भक्तांना मदत करीत आहेत. एकूणच शिर्डीत साईमय वातावरण दिसून येत आहे.
0 Comments