पुणतांबा येथील मंदिर विटंबनेबाबत नर्मदेश्‍वर सेवाधाम व सर्व साधकांच्या वतीने तीव्र निषेध--महंत आत्माराम गिरीजी महाराज



शिर्डी (प्रतिनिधी) राहाता तालुक्यातील श्रीक्षेत्र पुणतांबा येथील पवित्र महादेव मंदिरांची सोमवारी आणि हनुमान मंदिराची शनिवारी अज्ञात इसमांकडून विटंबना करण्यात आली असल्याची घटना समोर आली आहे. ही घटना अत्यंत दु:खद आणि संतापजनक असून, धार्मिक श्रद्धा व संस्कृतीचा अवमान करणारी आहे. या घटनेचा श्री नर्मदेश्वर सेवाधामच्या वतीने व हजारो साधकांच्या वतीने तीव्र निषेध करत असून या घटनेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी श्री नर्मदेश्वर सेवाधामचे महंत आत्माराम गिरीजी महाराज यांनी प्रसिद्धीला दिलेल्या एका पत्रकातून  केली आहे. अहिल्या नगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील श्रीक्षेत्र पुणतांबा हे धार्मिक तीर्थस्थान असून दक्षिणकाशी संबोधले जाते. अशा पवित्रश्रीक्षेत्र पुणतांबा येथीलमहादेव मंदिर व हनुमान मंदिर हे पुणतांब्याच्या जनतेसाठी श्रद्धास्थान आहेत. अशा पवित्र स्थळांवर झालेल्या विटंबनेने धार्मिक भावना दुखावल्या आहेत. या प्रकाराला जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी आमची प्रशासनाला विनंती आहे.

धार्मिक स्थळांची पवित्रता राखणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी शांतता राखावी व कायदा हातात न घेता प्रशासनाला सहकार्य करावे. आम्ही स्थानिक प्रशासनाकडे या प्रकरणाचा तातडीने तपास करून दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करतो.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर, नर्मदेश्वर सेवा धामच्या वतीने व साधू-संतांच्या समाजाच्या , साधकांच्या वतीने आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करतो , अशा घटनां वारंवार घडणार नाहीत. याबाबत योग्य ती उपाययोजना प्रशासनाने करणे गरजेचे आहे.
धर्म, संस्कृती आणि परंपरेचा आदर राखणे ही आपली जबाबदारी आहे. सर्व भक्तगणांनी याप्रकरणी एकजूट दाखवून या विषयाला गांभीर्याने घ्यावे.असे प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात श्री नर्मदेश्वर सेवाधामचे महंत अशोक महाराज निर्मळ उर्फ आत्माराम गिरी महाराज यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments