सावळीविहीर येथील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते ग्रा.सदस्य प्रदीप नितनवरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा!

शिर्डी( प्रतिनिधी)
 राहाता तालुक्यातील सावळीविहीर वाडी येथील तरुण सामाजिक कार्यकर्ते प्रदीप नितनवरे यांचा वाढदिवस नुकताच मोठ्या उत्साहात व विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.
सावळीविहीर वाडी येथे वास्तव्यास असलेले प्रदीप नितनवरे हे सावळीविहीर बुद्रुक ग्रामपंचायतचे सदस्य असून ते सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक क्षेत्रात नेहमी आघाडीवर असतात. कोणतेही काम असो, कोणाचेही काम असो त्यासाठी अहोरात्र धडपड करणारे, सुखदुःखात नेहमी सहभागी होणारे , हसतमुख, व धडाडीचे तरुण कार्यकर्ते म्हणून त्यांची सावळीविहीर व परिसरात एक ओळख आहे. त्यांचा मित्रपरिवार ही मोठा असून
त्यांचा वाढदिवस असल्यामुळे मित्र परिवाराच्यावतीने त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ मित्र परिवाराच्या वतीने प्रदीप नितनवरे यांचे पुष्पहार ,शाल देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य सरपंच महासंघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब जनार्दन जपे यांनी प्रदीप 
नितनवरे यांना पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत आपल्याकडून असेच यापुढेही सामाजिक कार्य घडत राहो! अशा सदिच्छा व्यक्त केल्या. तसेच त्यांना व त्यांच्या परिवाराला तसेच उपस्थित सर्वांना दीपावली-पाडव्याच्या ही शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या. सरपंच ओमेश साहेबराव जपे यांनीही प्रदीप नितनवरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. व त्यांच्या सामाजिक कार्याचे यावेळी त्यांनी कौतुकही केले.यावेळी राहाता ता. बाजार समितीचे संचालक शांताराम जपे, उपसरपंच विकास जपे, मा. चेअरमन कैलास सदाफळ, ग्रा. सदस्य गणेश आगलावे, दत्तू आगलावे, दिलीप सदाफळ, दिलीप गायकवाड,पत्रकार राजेंद्र गडकरी, राजू दुनबळे, प्रभाकर जपे, प्रमोद कोपरे, सुनील जपे, गोकुळ जपे, संतोष आगलावे, कैलास पळसे ,राहूल आगलावे, महेश जपे, राजेंद्र आगलावे ,शरद आगलावे ,सतीश जपे, नाना पवार, आदी सह ग्रामपंचायत सदस्य ,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सावळीविहीर वाडी, लक्ष्मीवाडी आदी ठिकाणी त्यांचा वाढदिवसानिमित्त सन्मान करण्यात आला. अभिनंदन करण्यात आले. त्याचप्रमाणे सोशल मीडियावर ,प्रत्यक्ष भेटूनही त्यांचे वाढदिवसानिमित्त अभिनंदन करण्यात येत होते. आपल्या वाढदिवसानिमित्त आपले हितचिंतक ,नातेवाईक मित्रमंडळी व सर्व संस्थांचे, संघटनांचे पदाधिकारी यांनी सोशल मीडियावर,व  प्रत्यक्ष भेटून वाढदिवसानिमित्त आपल्याला शुभेच्छा दिल्या. अभिनंदन करत सत्कार केले. त्याबद्दल आपण मनापासून आभारी असून सर्वांचे धन्यवाद प्रदीप नितनवरे यांनी मानले आहेत.

Post a Comment

0 Comments