शिर्डी( प्रतिनिधी)
देशांमध्ये सर्वात मोठा दीपावली हा सण समजला जातो. या सणाला सर्वत्र मोठा उत्साह आनंद, सर्वत्र दिसत असतो. मात्र दवाखान्यांमध्ये रुग्ण तसेच रुग्णांचे नातेवाईक हे दुःखी असतात. रुग्ण कधी बरा होईल याच्या प्रतीक्षेत असतो.
त्यामुळे अशा रुग्णालयात दाखल असणाऱ्या व उपचार घेत असलेल्या रुग्ण व रुग्णांचे काही नातेवाईकही हा सर्वात मोठा सण दिवाळी असूनही दवाखान्यात असतात. तो रुग्णांकडून साजरा केला जात नाही.अशा रुग्णांची दिवाळी येथे काही अंशी साजरी व्हावी. त्यांच्या दुःखातही काहीसा आनंदाचा पाझर यावा , जिकडे तिकडे मिठाई फराळाचे वाटप केले जाते.हा उद्देश ठेवूनच साई संस्थांनच्या श्री साईनाथ रुग्णालय व साईबाबा हॉस्पिटल येथे असणाऱ्या रुग्णालयातील रुग्णांना संस्थांनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते मिठाईचे वाटप दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात आले.व सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. आपल्याला रुग्णालयात दिवाळीनिमित्त मिठाई दिली. शुभेच्छा दिल्या. याचा रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. यावेळी प्रभारी उपवैद्यकीय संचालक डॉक्टर दीपक कांदळकर व आधिसेविका नजमा सय्यद आदींसह रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक व संस्थान हॉस्पिटलचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
0 Comments