शिर्डी ( राजकुमार गडकरी)
प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी शुक्रवारी शिर्डीला भेट दिली. श्री साई समाधी मंदिरात जाऊन
श्री साईबाबांचच्या माध्यान्ह आरतीस उपस्थित राहुन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. साईदर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर. यांनी साईप्रसाद व शाल देऊन सत्कार केला.
यावेळी अनुराधा पौडवाल यांनी साईबाबांचे दर्शन झाल्यानंतर मोठ्या समाधान वाटले. येथील साई संस्थान चांगले कार्य करत आहे. सवलतीच्या दरात संस्थांनच्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांची सेवा केली जात असून असेच कार्य साईसंस्थान कडून होत राहावे. अशी साईचरणी प्रार्थना ही त्यांनी यावेळी केली.
प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल शिर्डीत आल्याचे समजताच त्यांचे चाहते यांनी त्यांना पाहण्यासाठी शिर्डी परिसरात गर्दी केली होती. अनुराधा पौडवाल या निस्सिम साईभक्त असून यापूर्वीही त्या शिर्डीला दर्शनासाठी आल्या होत्या.
0 Comments