भारतीय संस्कृतीत सण-वार, रूढी परंपरा मोठी! त्यातूनच मिळत असते आनंद- शांती----महंत रामगिरीजी महाराज, साईबाबा एम्प्लॉईज सोसायटीचा डिव्हीडंड व दिवाळी भेटवस्तू वाटप प्रारंभकार्यक्रम उत्साहात संपन्न!

शिर्डी (राजकुमार गडकरी)
ज्ञानाच्या प्रकाशामुळे अज्ञानाचा अंधकार दूर होत असतो. ज्ञान हे  कधी नष्ट होत नाही. ज्ञानधन हे कमी होत नाही. उलट त्याची वृद्धी होत असते .ज्ञानाला कर नाही, डर नाही, ज्ञानातला वाटा कुणी मागत नाही. त्यामुळेच ज्ञान हे प्रत्येकाचे गुप्तधन आहे. असं सांगत भारतीय सनातन संस्कृतीत रूढी परंपरा मोठी आहे. व त्यातून निसर्गाचा समतोल राखला जातो व त्यासाठीच सण-वार आनंदाने साजरे केले जातात.


 असाच हा दिवाळी सण सर्वांच्या जीवनात मोठा आनंद घेऊन यावा यासाठी दिवाळी भेट देऊन श्री साईबाबा एम्प्लॉयज सोसायटी मोठा प्रयत्न करत आहे. असे मत सरला बेटचे महंत रामगिरीजी महाराज यांनी व्यक्त केले.
शिर्डी येथील श्री साईबाबा एम्प्लॉईज सोसायटीच्या वतीने सभासदांना यावर्षी दिवाळीनिमित्त 15 टक्के डिव्हीडंट आणि ठेवीवर नऊ टक्के व्याज तसेच प्रत्येक सभासदाला दिवाळी भेट म्हणून 50 किलो साखर, भिंतीवरील घड्याळ, पाच लिटर तेलाचा डब्बा ,एक किलो फरसाण व एक किलो मिठाई या दिवाळी भेट वस्तूंचा वितरण प्रारंभ नुकताच शिर्डी येथे साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर तसेच सरला बेट चे महंत रामगिरीजी महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे महंत श्री काशीकानंद महाराज यांच्या हस्ते  नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या दिवाळी भेटवस्तू वितरण प्रारंभ कार्यक्रमाला साई संस्थानचे प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले, श्रीमती प्रज्ञा मंहाडुळे, विश्वनाथ बजाज, मुख्यालेखाधिकारी श्रीमती मंगला वराडे ,संरक्षण अधिकारी पोलीस निरीक्षक रोहिदास माळी आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.


यावेळी मंहत रामगिरीजी महाराज म्हणाले की, उपवास म्हणजे लघंन यातून भक्ती व आपले आरोग्य ही साध्य होते. जीवनामध्ये जेथे शांती आहे तेथे आनंद मिळतो. व या संस्थेने आपल्या सभासदांना जीवनात शांती मिळावी ,आनंद मिळावा म्हणूनच दिवाळी भेट देऊन एक प्रकारे सभासदांचा आनंद वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.असे त्यांनी  सांगितले.
तर महंत काशिकानंद महाराज यांनी यावेळी म्हटले की, या संस्थेने ही दिवाळी सर्वांची आनंदाने व्हावी म्हणून दिवाळी भेट वाटपाचा शुभारंभ आज केला. हा त्यांचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी संस्थांनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर म्हणाले की, या सोसायटीचे कामकाज चांगल्या रीतीने चालले आहे ते त्यांच्या कार्यावरून दिसून येत आहे .सोसायटी काम करत असताना त्यांची मोठी मदत संस्थानाला होत असते. पार्किंग मोबाईल स्टॅन्ड ,पादत्राने स्टॅन्ड, दर्शन रांगेत भक्तांना थंडपेय इतर वस्तू विना तक्रार मिळत असतात. असे काळजीपूर्वक या सोसायटीचे काम सुरू आहे. असे त्यांच्या कार्यावरून दिसून येते असे सांगत संस्थांनमध्ये काही कामगारांचा प्रश्न मार्गी लागला. राहिलेल्या कामगारांचाही प्रश्न लवकरच मार्गी लागेल. असे यावेळी आश्वासन देत सर्वांनी साईंच्या कार्याचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे .बाबांचे कार्य सर्वांना माहिती असायला हवे त्यासाठी साईंच्या जीवनावरील विविध पुस्तके, ग्रंथ याचा अभ्यास प्रत्येकाने केला पाहिजे. त्यातून कर्मचाऱ्यांची परीक्षा ही घेण्यात येईल .असा प्रयत्न आहे. त्याचा सर्वांनाच फायदा होईल. असे सांगत बाबांवर श्रद्धा ठेवून काम करा, तात्पुरत्या लोभाला बळी पडू नका ‌असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या संस्थेचे चेअरमन विठ्ठलराव पवार यांनी संस्थेत गेल्या सहा महिन्यापासून विविध सभासदांच्या हिताचे व पारदर्शी असे निर्णय घेण्यात आले असून संस्थेची प्रगती अधिकाधिक कशी होईल, संस्थेपासून येथे येणाऱ्या भाविकांना अधिक सुविधा ,लाभ कसा देता येईल ,असा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा सातत्याने प्रयत्न असून त्यास सर्वांचे सहकार्य मिळत आहे. असे सांगत कर्मचाऱ्यांचा दहा लाख रुपयांचा नैसर्गिक विमा आजपासून संस्था पन्नास टक्के व संबंधित कर्मचाऱ्यांकडून 50 टक्के या तत्त्वावर विमा हप्ता भरून उतरवला जात आहे. तसेच संस्थेच्या सभासदांना पंधरा टक्के डिव्हिडंट व ठेवीवरील नऊ टक्के लाभांश वर्ग करण्यात आला आहे. ठरल्याप्रमाणे दिवाळी भेट आजपासून दिली जात असून साई संस्थांनचे कामगार म्हणजे धार्मिक तीर्थक्षेत्रातील कामगार आहेत. त्यामुळे येथे सकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली असते. संस्थांनमध्ये गोरक्ष गाडीलकर साहेब आल्यामुळे आणखी प्रगती होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगत संस्थान अधिकारी, त्रि सदस्य समिती यांच्या सहकार्यानेच सोसायटीचा व्यवसाय, कारभार चांगला होत आहे व संस्थेचे सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ, कर्मचारी, सभासदाप्रमाणेच साई भक्तांनाही जास्तीत जास्त सेवा कशी देता येईल. याचा प्रयत्न करीत आहे. साईभक्त, संस्थान कर्मचारी व सोसायटी असे त्रिसूत्रीकरण करून कामकाज करण्याचा आमचा प्रयत्न असून गुढीपाडवा, मकर संक्रांती नंतर आता दिवाळी सभासदांची गोड कशी होईल याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. संस्थेच्या प्रगतीमध्ये सर्व संचालक, सभासदांचाही मोठा वाटा आहे. असे सांगत उपस्थित सर्व मान्यवरांचे त्यांनी यावेळी आभार मानले.यावेळी संस्थेचे व्हा.चेअरमन पोपटराव कोते, तसेच संस्थेचे संचालक महादू कांदळकर, संभाजी तुरकणे ,मिलिंद दुनबळे  भाऊसाहेब लवंडे , सुनंदा जगताप, कृष्णा आरणे ,देविदास जगताप, तुळशीराम पवार, इकबाल तांबोळी ,सौ लता बारसे, भाऊसाहेब कोकाटे ,विनोद गोवर्धन कोते, गणेश अहिरे, संभाजी गागरे व तज्ञ संचालक भाऊसाहेब लबडे ,सचिव नबाजी नामदेव डांगे ,सहसचिव विलास वाणी व संस्थेचे सर्व कर्मचारी सभासद मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments