कर्नाटक येथील अकिला शेट्टी यांनी सोन्‍याचा ब्रोच श्री साईचरणी केला‌अर्पण!त्याची किंमत अंदाजे ५ लाख ५० हजार रुपये !

शिर्डी (प्रतिनिधी)श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भक्‍तांची श्रद्धा आहे. याच श्रद्धेपोटी भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात. अशाच प्रकारे आज मंगळुर, कर्नाटक येथील अकिला शेट्टी यांनी जवळपास ६८ ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम असलेला सोन्‍याचा ब्रोच श्री साईचरणी अर्पण केला. 

या ब्रोच ची किंमत अंदाजे ५ लाख ५० हजार रुपये असून हा सुंदर नक्षिकाम केलेला ब्रोच साईबाबांच्या चरणी अर्पण करुन श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर भा.प्र.से. यांच्‍याकडे सुपुर्द केला. त्‍यानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्‍यांचा सत्‍कार केला.

Post a Comment

0 Comments