लोहगाव (वार्ताहर)
कृषी क्षेत्र हे परिपूर्ण विज्ञान आहे. या ठिकाणी ज्ञान दानाचे काम अतिशय स्तुत्य असते. असे विचार कृषीभूषण पुरस्कार विजेते व सेंद्रिय शेती राज्य सल्लागार डॉ. प्रशांत नाईकवाडी यांनी व्यक्त केली.
राहता तालुक्यातील लोहगाव येथे गुरुकृपा ॲग्रो ट्रेडर्स यांच्या संकल्पनेतून रब्बी हंगाम शेतकरी बंधू स्नेहसंमेलन व मार्गदर्शन कार्यक्रम नुकताच बाबासाहेब भाऊराव चेचरे यांच्या वस्तीवर संपन्न झाला. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहुलजी पवळे हे होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज. बळीराजाची प्रतिमा व स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलन प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांच्या यावेळी सत्कार संपन्न झाला. यावेळी बोलताना प्रशांत नाईकवाडी म्हणाले की आज शेतकऱ्यांची परिस्थिती फार भयंकर आहे. अस्मानी संकट मातीचे आरोग्य दिवसेंदिवस बिघडत चाललेले आहे. त्याचबरोबर मानवी आरोग्य देखील बिघडत चाललेले आहे. मातीचा सामो हा दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे. मातीचा सामो हा सहा ते सात पर्यंत पाहिजे परंतु तो आता आठ पर्यंत पोहोचल्यामुळे . क्षारयुक्त जमीन प्रमाण वाढले कीड व रोगाचे दिवसेंदिवस प्रमाण वाढत चाललेले आहे. जमिनीत अन्नद्रव्य टिकून ठेवण्याची कॅपिशिटी आता फार कमी झालेले आहे .आज आपण प्रचंड रासायनिक खते टाकतो. किड व आळी मारण्यासाठी आपण अतिशय घातक विषारी औषधे फवारणी करतो त्यामुळे पिकांवर पडलेली आळी मरते परंतु जी आळी पशुपक्षी खातात त्यांना देखील मोठ्या प्रमाणात इजा होऊन तेही मृत्युमुखी पडतात ..त्यामुळे चिमण्या सारखे पशुपक्षी आज कमी होत चाललेली आहे .माशांचे प्रमाण देखील कमी होत चाललेले आहे त्याचे कारण की विषारी औषधी फवारणीमुळे पशु पक्षांप्रमाणे मानवालाही मोठ्या प्रमाणात घातक ठरत आहे. प्रत्येक नागरिकांना विषमुक्त अन्न मिळालेच पाहिजे हा त्याचा अधिकार आहे. आज विषारी औषधे फवारणी केलेले फळभाज्या आपण खाल्ल्या तर कर्करोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे.
२०२५ पर्यंत याचे प्रमाण १२% पर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही .याला कारणीभूत कृषी रासायनीक खते व औषधे आहे. आता मातीच्या आरोग्याकडे आपण सर्वांनी लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी कृषी पदवीधर असणाऱ्या कडूनच रासायनिक खताची खरेदी आपण केली पाहिजे पिकांसाठी योग्य असे सल्ला त्यांच्याकडून मिळतो व सेंद्रिय शेतीकडे जास्त प्रमाणात आकर्षित होण्याची आज नितांत गरज आहे.
सौ शैलेजा नावंदर म्हणाले की सेंद्रिय शेती प्रत्येक शेतकऱ्यांनी केली पाहिजे ही काळाची गरज आहे. काळाची नव्हे तर देशाची व जगाची गरज आहे. सेंद्रिय शेतीचा रिझल्ट हळूहळू मिळतो. परंतु आता आपल्याला रासायनिक शेतीचा पगडा आहे . जमीन ही आपली आई आहे तिच्याकडून पाहिजे तीतकेच घ्यायला. अति विषारी फवारणीमुळे शेती नापीक होत चाललेली आहे. रासायनिक खते विषारी औषधे यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेती उपजात ठेवण्यासाठी आपल्याला सेंद्रिय शेती केलीच पाहिजे रासायनिक शेती मुळे कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. तुमच्या पुढील चार पिढ्यांना आपल्याला सजीव शेती आपल्याला द्यायचे आहे. त्यासाठी आपल्या सर्वांना सेंद्रिय शेतीच करावी लागेल. मी स्वतः ८०% पर्यंत सेंद्रिय शेतीच करते .पण फारच प्रॉब्लेम आला तरच कीटकनाशकाचा फवारणी करते. शेतीवरील खर्च आपणास कमी करायचा आहे. जर शेतीवरील खर्च वाढला तर होणाऱ्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे. रासायनिक शेतीपेक्षा सेंद्रिय शेती उत्पन्न मिळते पण त्याला फार हळूहळू रिझल्ट मिळतो असे त्या यावेळी म्हणाल्या. यावेळी राहुलची पवळे .ऋषिकेश काळे .कैलास दिवटे .अनिल हारदे अनिकेत झावरे व प्रशांत उंबरकर यांनीही यावेळेस आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक किरण चेचरे यांनी केले. आभार अक्षय चेचरे यांनी मानले.
0 Comments