गलवाड्यात दिवाळी पाडव्याला रेड्यांचा सगर उत्सव उत्साहात,अनोख्या लोकपरंपरेने वेधले ग्रामस्थांचे लक्ष,रेड्यांची अर्धा तास झुंज-----




दिलीप शिंदे 
सोयगाव, दि. १२ ---- सोयगाव तालुक्यातील गलवाडा (अ) येथे दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने सालाबादप्रमाणे रेड्यांचा पारंपरिक सगर उत्सव दि.१० मंगळवारी उत्साहात साजरा करण्यात आला. या अनोख्या लोकपरंपरेने ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले होते.
पोळ्याच्या सणाप्रमाणे रेड्यांना सजवून, रंगरंगोटी करून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. 

गावाच्या वेशीबाहेर रेड्यांची विधिवत पूजा करून औक्षण करण्यात आले. यावेळी रेड्यांच्या मालकांचाही सन्मान करण्यात आला. त्यानंतर रेड्यांची झुंज लावण्यात आली. सुमारे अर्धा तास चाललेल्या या झुंजीचा आनंद ग्रामस्थांनी घेतला. यावेळी मल्लू आप्पा औरंगे, जानकीराम औरंगे, मोहन औरंगे, गंगाराम दाभाडे, एकनाथ लवटे, मधुकर लवटे, समाधान लवटे, बुढाआप्पा औरंगे, सुनील सैदाणे, किरण इंगळे, पंजाबराव कुनगर, आनंदा इंगळे, अक्षय औरंगे, अनिल औरंगे, अंबादास घुले, पांडुरंग औरंगे, विजय औरंगे, शरद औरंगे, प्रदीप कुनगर, जितेंद्र सोनवणे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments