कॉमनवेल्थ कबड्डी चॅम्पियनशिप भारताला सुवर्णपदक मिळवून देणारे शिवम अनिल पटारे, यांची भव्य मिरवणूक व सत्कार

दिलीप लोखंडे 

टाकळीभान प्रतिनिधी - कॉमनवेल्थ कबड्डी चॅम्पियनशिप भारताला सुवर्णपदक मिळवून देणारे शिवम पटारे यांची टाकळीभान येथे ग्रामस्थांच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली व भव्य नागरी सत्कार करण्यात आले,

    कबड्डी खेळाचे माहेरघर असलेल्या टाकळीभानचा भूमिपुत्र प्रो कबड्डी स्टार खेळाडू शिवम अनिल पटारे याची कॉमनवेल्थ कबड्डी चॅम्पियनशिपसाठी भारतीय पुरुष संघात खेळून अहमदाबाद येथे दि.२१ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत झालेल्या कॉमनवेल्थ कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेसाठी वरिष्ठ पुरुष खेळाडूं टाकळीभानचा प्रो स्टार कबड्डी खेळाडू शिवम अनिल पटारे भारताला सुवर्णपदक मिळवून दिले , व आपल्या गावी प्रथमच आल्याबद्दल प्रथम बस स्टँड शेजारी झाकून ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे आरती शिवम पटारे यांच्या हस्ते करण्यात आली,
    ग्रामस्थांच्या वतीने भव्य मिरवणूक कढुन भव्य सत्कार करण्यात आला , टाकळीभान येथे कबड्डी खेळाडू, क्रीडाप्रेमी ग्रामस्थ यांनी फटाके वाजून जल्लोष व आनंद साजरा केला. टाकळीभान व महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा क्षण असून याच गावचा भूमिपुत्र भारत देशाला आशिया ऑलम्पिक कबड्डी स्पर्धेमध्ये दोन गोल्ड मेडल मिळवून देणारा खेळाडू असलम इनामदार व त्या पाठोपाठ प्रो स्टार कबड्डी खेळाडू शिवम पटारेच्या या यशामुळे टाकळीभानची मान पुन्हा एकदा कबड्डी क्षेत्रात अभिमानाने उंचावली आहे. व भारतीय कबड्डी संघाला या टाकळीभानच्या मातीने उत्कृष्ट व दर्जेदार कबड्डी खेळाडू दिल्याने येथील ग्रामस्थांमध्ये व कबड्डी क्रीडाप्रेमी मधून आनंदाचे वातावरण आहे. शिवम या यशाबद्दल टाकळीभान प्रा . माणिकराव राठोड ' अनिलराव जगदाळे , दत्ता (आबा ) टेके ,राहूल कोकणे , वसिम इनामदारचे उपसरपंच कानोबा खंडागळे, सोसायटीची चरणी राहुल पटारे, युवक नेते भाऊसाहेब पवार, संदीप जावळे सर,तुळशीदास उंडे, राष्ट्रवादी किसान सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोकणे, अनिलराव पटारे सर,माजी प्राचार्य जयकर मगर, किरणराव धुमाळ, रवी गाडे, भैया पठाण, राहुल कोकणे,प्राध्यापक बद्रीनाथ पटारे, संभाजी पटारे, धावपटू भाऊसाहेब गव्हाणे,काकासाहेब डिके एकनाथ पटारे, बालाजी पटारे, पंकज जाधव,जिल्हा बँकेचे माजी शाखा अधिकारी अशोकराव पटारे, प्रतापराव पटारे, मयूर लोखंडे,व गावातील मान्यवर, पदाधिकारी, ज्येष्ठ श्रेष्ठ कबड्डी खेळाडू क्रीडा प्रेमी ग्रामस्थ यांनी त्याचे अभिनंदन व कौतुक केले आहे,

Post a Comment

0 Comments