श्री हेरंब कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली एकल महिलांना दिवाळी किराणा कीटचे वाटप या संकल्पनेची अंमलबजावणी तालुका समन्वयक श्री प्रकाश जोंधळे यांनी सुहास पवार सरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केली.
हिंदू धर्मातील अतिशय मोठा मानला जाणारा दिवाळी सणाच्या निमित्ताने पाच एकल गरजवंत महिलांना किराणा सामान किट चे वाटप करण्यात आले. तसेच साऊ एकल महिला समिती, सर्व शिक्षक बंधू भगिनींच्या वतीने, लायन्स क्लबच्या वतीने, श्री सुहास पवार सर यांना वाढदिवसाच्या निमित्ताने सत्कार करून खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या
.तसेच त्यांच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे मनःपूर्वक सर्वांनी कौतुक केले. या कार्यक्रमाच्याप्रसंगी तालुका समन्वयक श्री. प्रकाश जोंधळे,डॉ. संजयजी उबाळे , राहाता नगरपालिकेचे गटनेते मुन्नाभाई शहा, , सदाफळ साहेब , खिझरभाई शहा, गावित साहेब ,तसेच पत्रकार दिलीपराव खरात ,डॉक्टर पंकज येलम ,शिक्षक संघटनेचे श्री दत्ता गायकवाड, श्री अरुण मोकळ, श्री सुनील लोमटे ,सुरेश नळे, सुधाकर आंत्रे, नारायण जाधव ,पांडुरंग सदगीर, मधुकर सगभोर,सुनील बोठे सर, माजी नगरसेवक विजय शिंदे उपस्थित होते.
0 Comments