*पत्रकारांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी देशातील पहिली पत्रकारांची मल्टीस्टेट बँक!*(महाराष्ट्रातून होणार विस्तार; ग्रामीण व तालुका स्तरावरील पत्रकारांना मिळणार आर्थिक आधार



 लोणी : (प्रतिनिधी )
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून समाजात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या पत्रकारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने राज्य मराठी पत्रकार परिषद, महाराष्ट्र प्रदेश यांच्या पुढाकारातून ‘पत्रकार नागरिक सहकारी मल्टीस्टेट बँक’ स्थापन करण्यात आली आहे. पत्रकारांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात असून, या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची मुहूर्तमेढ मराठवाड्यातून रोवण्यात आली आहे. देशभरातील पत्रकारांच्या हितासाठी उभारण्यात येणारी ही अभिनव बँक असल्याचे परिषदेकडून सांगण्यात आले.

या बँकेचे जाळे भविष्यात संपूर्ण देशभर विस्तारले जाईल, अशी माहिती राज्य मराठी पत्रकार परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे यांनी दिली. पत्रकारांच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन उभारण्यात येणाऱ्या या बँकेच्या माध्यमातून पत्रकारांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. विशेषतः ग्रामीण आणि तालुका पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या उपक्रमाच्या माध्यमातून पत्रकारांना कमी व्याजदरात कर्ज, विमा सुविधा, बचत योजना तसेच आपत्कालीन परिस्थितीत आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पत्रकारांना केवळ आर्थिक गरजा भागविण्यासाठीच नव्हे, तर भविष्यातील आर्थिक सुरक्षितता आणि सामाजिक स्थैर्य मिळवून देणे हा या बँकेचा प्रमुख उद्देश आहे.
यावेळी राज्य मराठी पत्रकार परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे, केंद्रीय संघटक तानाजी लामखेडे मामा, व नुकतीच अहिल्या नगर जिल्ह्याची संघटना पदाधिकारी नियुक्ती झालेले अहिल्यानगर जिल्हा महिला अध्यक्ष रूपाली भालेराव जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर साबळे, राहता तालुका अध्यक्ष गोपाळ राऊत, राहता तालुका संघटक श्रीपाद बोकंद,आदी पदाधिकारी उपस्थित होते. या पद नियुक्ती सोहळ्याला उपस्थित मान्यवर सतीश मनतोडे, आंधळे साहेब, बोरुडे, विजय माळवे, वैभव हंडाळ, सौ . मंदा काळे.आदी मान्यवर कार्यक्रमाचे अध्यक्ष
मधुसूदन कुलथे यांनी पत्रकारांच्या आर्थिक सुरक्षिततेवर भर देताना सांगितले की, देशात प्रथमच केवळ पत्रकारांच्या हितासाठी अशा स्वरूपाची बँक उभारली जात आहे. जागतिक दर्जाचे पत्रकार असोत किंवा ग्रामीण भागातील पत्रकार, सर्वांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही बँक महत्त्वाची भूमिका बजावेल.
पत्रकारांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याबरोबरच त्यांच्या भविष्याची सुरक्षितता आणि सामाजिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. बँकेला मिळणारा प्रतिसाद उत्साहवर्धक असून, लवकरच महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्येही या बँकेचा विस्तार केला जाणार आहे.
पत्रकारांच्या हितासाठी सुरू करण्यात आलेला हा उपक्रम पत्रकारिता क्षेत्रातील आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण ठरणार असून, विशेषतः ग्रामीण आणि तालुका स्तरावर कार्यरत असलेल्या पत्रकारांना याचा मोठा फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments