अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची दहा संचालकांसाठी नुकतीच निवडणूक होऊन आज मतमोजणी झाल्यानंतर या जिल्हा बँक निवडणुकीत कोपरगावचे आमदार आशुतोष काळे, नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके, राहुरीचे प्राजक्ता तनपुरे, तसेच अकोले येथील बँकेचे माजी चेअरमन सिताराम गायकर यांची कन्या संजीवनी शिंदे , आदी विजयी झाले आहेत.
अहिल्या नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 11 जागा या बिनविरोध निवडून आल्या होत्या. ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न झाला. मात्र दहा जागेसाठी हि निवडणूक झाली. या दहा जागेच्या मतदानाची मतमोजणी मंगळवारी सकाळी सुरू होऊन दुपारपर्यंत सर्व निकाल जाहीर झाले. शेती पूरक मतदार संघात आमदार आशितोष काळे यांना 750 तर सुधीर मस्के यांना 124 मते मिळाले आहेत. आमदार आशुतोष काळे हे 626 मतांनी विजयी झाले आहेत. विविध कार्यकारी सेवा सोसायटी मतदारसंघातील अकोले मधील सिताराम गायकर यांच्या कन्या संजीवनी शिंदे यांनी 49 मते मिळवत विजय मिळवला आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी आमदार किरण लहामटे यांना 36 मतांवर समाधान मानावे लागले. त्यांचा पराभव झाला आहे. पारनेर मतदार संघात खासदार निलेश लंके यांनी 63 मते मिळवत राहुल शिंदे यांचा पराभव केला आहे राहुल शिंदे यांना 40 मते पडले आहेत. कर्जत मतदारसंघात ज्योती प्रकाश शिंदे यांनी 54 मते मिळवून तुषार अंबादास पिसाळ यांचा पराभव केला असून तुषार मिसाळ यांना 20 मते पडले आहेत. राहुरी मतदार संघात प्राजक्ता तनपुरे यांना 89 मते तर सत्यजित कदम यांना 18 मते पडले आहेत .राहुरी मतदारसंघात प्राजक्ता तनपुरे निवडून आले असून सत्यजित कदम यांचा पराभव झाला आहे. विमुक्त जाती भटक्या जमाती मतदारसंघातून गणपतराव सांगळे विजयी झाले आहेत. सांगळे यांना 2461 मते मिळाले आहेत तर ढाकणे यांना 1290 मते पडले आहेत. गणपतराव सांगळे हे विजयी झाले आहेत. इतर मागासवर्ग राखीव मतदार संघातून जावळे कारभारी झुंबर हे विजय झाले आहेत. त्यांना 2784 मते पडले आहेत तर त्यांच्या विरोधात असणारे जालिंदर वाकचौरे यांना 732 मते पडले आहेत. कारभारी जावळे हे 2052 मतांनी विजयी झाले आहेत. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती राखीव मतदार संघातून माजी आमदार वैभव पिचड यांना एकूण 2687 मते पडले असून त्यांच्या विरोधात असणारे प्रशांत लोखंडे यांना १०८७ मते पडले आहेत. माजी आमदार वैभव पिचड हे 1600 मतांनी विजयी झाले आहेत. महिला राखीव मतदार संघातून अनुराधाताई नागवडे 2625 आणि संगीता जयंत वाघ यांना 2283 इतकी मते पडले आहेत.या विजयी झाल्या आहेत. त्यांच्या विरोधात असणाऱ्या काकडे व महांडुळे यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. या निवडणुकीत सहकार विकास आघाडीच्या १७
+१ अशा 18 जागा निवडून आले आहेत. परिवर्तन चे एक व नामदार राम शिंदे च्या दोन जागा निवडून आले आहेत. या जिल्हा बँकेवर सहकार विकास आघाडीचे वर्चस्व झाले असून आता चेअरमन व्हा. चेअरमन कोण होतं याकडे सर्व सभासदांचे व जिल्हा वाशियांचे लक्ष लागले आहे.
0 Comments