नवनिर्वाचित सर्व संचालकांचे अभिनंदन करतसहकार विकास आघाडीचे सर्व ज्येष्ठ नेते व संचालकाच्या मार्गदर्शनाखालीच पुढील निर्णय ‌ होईल-- भाजपा प्रदेशाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील

अहिल्यानगर- 
(प्रतिनिधी)- 
महाराष्ट्रात सहकार क्षेत्रात मोठ्या असणाऱ्या अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांच्या चर्चेनुसार संचालक मंडळातील जागांचे नियोजन करण्यात आले होते. आज 21 पैकी 18 संचालक हे आमच्या सहकार विकास आघाडीचे निवडून आले आहेत. या बँकेच्या चेअरमन पदाबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नसून सर्व संचालकांना विश्वासात घेऊन ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य वेळी निर्णय घेतला जाईल .असे युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी म्हटले आहे. 
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक झाल्यानंतर भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष युवा नेते माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी अहिल्यानगर येथे पत्रकार परिषद घेतली .निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित संचालकांचे त्यांनी अभिनंदन केले आहे. 

डॉक्टर सुजय विखे पाटील यावेळी म्हणाले की या निवडणुकीत नामदार प्राध्यापक राम शिंदे यांच्या गटाचे दोन संचालक निवडून आले असून पारनेर मधून खासदार निलेश लंके हेही लोकशाही प्रक्रियेतून विजय झाले आहेत .त्या सर्वांचे आमच्या सहकार विकास आघाडीच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन आहे .डॉक्टर विखे पाटील यांनी नमूद केले की ,विशेष म्हणजे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत कुठेही वैयक्तिक चिखलफेक किंवा आरोप प्रत्यारोप झाले नाहीत आणि बँक ठेवीदारांचा, सभासदांचा विश्वास अबाधित राखला गेला. याबद्दल त्यांनी सर्व उमेदवारांचे व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानले आहेत.चौकट 
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. या बँकेच्या निवडणुकीच्या अंतिम निकाल जाहीर झाला असून सहकार क्षेत्रातील या बँकेचे चित्र स्पष्ट झाले आहे. या बँकेमध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित 21 संचालकांची अधिकृत नावे--

डॉक्टर सुजय विखे पाटील राहता बिनविरोध 

करण ससाणे श्रीरामपूर बिनविरोध 

प्राजक्ता तनपुरे राहुरी विजयी 

शंकराव गडाख नेवासा बिनविरोध 

अक्षय कर्डिले अहिल्यानगर बिनविरोध 

संजीवनी शिंदे अकोले विजयी 

रणजीत सिंह देशमुख संगमनेर बिनविरोध 

बिपिन कोल्हे कोपरगाव बिनविरोध 

राजश्री घुले शेवगाव बिनविरोध 

मोनिका राजळे पाथर्डी बिनविरोध 

निलेश लंके पारनेर विजयी 

दत्तात्रय पानसरे श्रीगोंदा बिनविरोध 

ज्योती शिंदे कर्जत विजयी 

सचिन घुमरे जामखेड बिनविरोध 

सचिन जगताप बिगर शेती बिनविरोध 

आ.आशुतोष काळे शेतीपूरक विजयी 

अनुराधा नागवडे महिला राखीव विजयी 

संगीता वाघ महिला राखीव विजयी 

कारभारी जावळे ओबीसी विजयी 

वैभव पिचड अनुसूचित जाती विजयी 

गणपत सांगळे, व्ही.जे,एन.टी विजयी

Post a Comment

0 Comments