जल, जंगल, जमीन वाचवण्याचासाठी गावाची वन बलिदानाची तयारी, जलविद्युत प्रकल्पासाठी ३ लाखा हून अधिक झाडे तोडली जाणार - आदिवासी जन नायक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती दिनी वडोद विठ्ठलाचे येथे जंगलाच्या रक्षणासाठी विशाल मानवी साखळी व चिपको आंदोलनाचे आयोजन ----




दिलीप शिंदे
सोयगाव दि.१०--अजिंठा डोंगर रांगेतील प्रस्तावित" ग्रीन -को एनर्जी "या कंपनीच्या प्रकल्पासाठी डोंगर -वनक्षेत्रातील खालच्या व वरच्या बाजुची ३ लाखाहून अधिक वृक्ष तोडली जाणार आहे. जल जंगल, जमीन, जीव, जन वाचविण्यासाठी भगवान बिरसा जी मुंडा यांच्या जयंती निमित्ताने कन्नड तालुक्यातील



 वडोद(विठ्ठलाचे ) या गावालगत असलेल्या व प्रकल्पात बाधित होणाऱ्या ४ किमी लांबीच्या घनदाट जंगला भोवती विशाल मानवी साखळी व चिपको आंदोलनाची म्हणजे "वन रक्षण शृंखलेचे " वडोद , वाडी , निमचौकी,नायगाव व परिसरातील आदिवासी बांधव,शेतकरी , निसर्ग स्नेही शेतकरी,राज्यातील विविध भागातील पर्यावरण प्रेमी नागरिक यांच्या वतीने येत्या रविवारी दि.१५ नोव्हेंबर रोजी ०८ ते १० या वेळेत विशाल मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले आहे. हे जंगल स्थानिक भागात 'रक्ताई डोंगर' म्हणून ओळखले जाते जे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वाधिक घनदाट वनक्षेत्र असून या ४ किमी च्या पट्ट्यात लाखो देशी वृक्ष असून हे पुरातन जंगल असून गौताळा अभयारण्य इथून १० किमी अंतरावर असून इथे वाघा सह वन्यजीवांचा मोठा राबता असतो. जिल्ह्याचे फुफ्फूस असणाऱ्या या जंगलाच्या रक्षणासाठी हजारोंच्या संख्येने निसर्ग प्रेमींनी स्वतःसोबत स्वतःचे बॅनर, पोष्टर घेऊन यावे, आपापल्या वतीने हे जंगल वाचविण्यासाठी , हा विषय जगापुढे माध्यमांच्या माध्यमातून मांडावा.मात्र कुठे ही कचरा करू नये,पिण्याचे पाणी सोबत आणावे.त्या ठिकाणी सह्यांची मोहीम राबविली जाणार आहे.असे आवाहन गावाच्या वतीने व अजिंठा वन रक्षण समितीच्या माध्यमातून डॉ.संतोष पाटील व डॉ.किशोर पाठक यांनी केले आहे. वडोद विठ्ठलाचे हे घाटनांद्रा गावा पासून ५ किमी पुढे (पश्चिमेला) व चिंचोली लिंबाजी गावापासून १० किमी (उत्तरेस) आहे. गावाच्या वतीने पांडुरंग दाभाडे ( वडोद) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आली आहे .

Post a Comment

0 Comments