दिलीप शिंदे
सोयगाव दि.१०-- सोयगाव हळदा रस्त्या वरील वेताळवाडी घाटात असलेल्या इच्छापूर्ती गणपती मंदिरातील गणपती मूर्तीचा चांदीचा मुकुट दि.०१ ते ०४ नोव्हेंबर दरम्यान चोरी झाल्याप्रकरणी कृष्णा शहाजी भोसले वय ४६ रा. हळदा ता. सिल्लोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोयगाव पोलीस ठाण्यात दि.०५ नोव्हेंबर रोजी भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर गोरे यांनी गांभीर्याने दखल घेतली होती. उपविभागीय पोलिस अधिकारी विश्वजीत काइगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर गोरे यांच्या नेतृत्वात पथक नेमण्यात आले होते.
त्या अनुषंगाने सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवून संशयित आरोपी आकाश पुंडलिक जाधव वय ३२ वर्ष रा. हळदा ता. सिल्लोड यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने दि.०९ सोमवारी अटक करून आरोपीकडून चोरीस गेलेला ७. ५ भार चा २१००० रु. किंमतीचा मुकुट जप्त करण्यात आला. सहाय्यक फौजदार इसरार मिर्झा, ज्ञानेश्वर दांडगे, नारायण जीरी, गजानन दांडगे, सादिक तडवी, राजेंद्र सोनवणे, शांताराम सपकाळ, पवन तायडे व कुणाल जाधव या पथकातील कर्मचाऱ्यांनी चोरीचा उलगडा केल्याने नागरिकांमधून पोलिसांच्या या कामगिरी बद्दल कौतुक केले जात आहे.
0 Comments