टाकळीभान प्रतिनिधी- समस्त लोहार समाज बांधवांसाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब
लोहार समाज राज्यस्तरीय समन्वय समितीच्या वतीने गेल्या अनेक महिन्यांपासून समाजाच्या विविध ज्वलंत प्रश्नांवर व ३२ प्रमुख मागण्यांवर शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू होता.
या संघर्षाला अखेर मोठे यश आले असून, नामदार गिरीशजी महाजन साहेब (जलसंपदा मंत्री, सुनील महाराष्ट्र राज्य) यांच्या अथक प्रयत्नांमुळे व जामनेर लोहार समाज व जेष्ठ समाज समाज सेवक श्री श्रीकृष्ण चंदनपाट साहेब यांच्या सहकार्यामुळे गेल्या २१ वर्षा नंतरच्या प्रदीर्घ काळानंतर, हि दुसरी भेट, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ठीक वाजता मंत्रालयात मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यासोबत शिष्टमंडळ दिलीप वसव, ॲड. युवराज जाधव . ललित सपकाळ,श्रीकृष्ण चंदनपाट
अंकुश थोरात ,विनायक हरळ सहा सदस्यीय शिष्टमंडळाची अत्यंत सकारात्मक बैठक संपन्न झाली.
कॅबिनेट बैठकीनंतर मंत्रालयाच्या विशेष सभागृहात पार पडलेल्या सुमारे २० ते २५ मिनिटांच्या या बैठकीत मा. मुख्यमंत्र्यांनी लोहार समाज राज्यस्तरीय समन्वय समितीचे ३२ मागण्यांचे निवेदन बारकाईने वाचले.
लोहार समाज हा अत्यंत कष्टाळू आणि प्रामाणिक, आपलाच समाज आहे. व लोहार समाज आर्थिक विकास महामंडळ लवकरच कार्यन्वित करून निधी वाढ, प्रतिनिधी नेमणूक बाबत ही खास निर्णय घेऊ तसेच समाजाच्या ३२ मागण्यांपैकी बहुतांश, त्यातील १२ ते १४ मुख्य व महत्वाच्या मागण्या शासन लवकरच मान्य करेल. या संदर्भात समितीला अधिकृत लेखी पत्र एक दोन दिवसात देण्यात येईल, तसेच गरज पडल्यास माध्यमां समोरही (मीडिया बाईट) भूमिका मांडू." असे प्रतिपादन, मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दिले.
या ऐतिहासिक बैठकीप्रसंगी शिष्टमंडळाच्या वतीने समन्वय समितीचा सन्माननीय मफलर व मानपत्र देऊन मा. मुख्यमंत्र्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. समाजाच्या हक्कांच्या या लढ्याला मिळालेले हे सकारात्मक आश्वासन म्हणजे प्रत्येक कष्टकरी समाजबांधवाच्या संयम आणि एकजुटीचा सन्मान आहे.
यावेळी उपस्थित शिष्टमंडळ
दिलीप रामचंद्र वसव ॲड. युवराज जाधव . ललित सपकाळ,
श्रीकृष्ण चंदनपाट , अंकुश थोरात
. विनायक हरळ उपस्थित होते,
0 Comments