हा सत्कार नक्कीच मला यापुढेही पोलीस दलात धडाकेबाज कामगिरी करण्याची देत राहील प्रेरणा--राष्ट्रपती पदक प्राप्त व नाशिकचे सिंघम सपोनि गुलाबराव सोनार

शिर्डी ( प्रतिनिधी)- -राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल पोलीस मित्रांकडून हा छोटाखाणी केलेला सत्कार नक्कीच यापुढेही कर्तव्यावर असताना धडाकेबाज कामगिरी करण्याची आणखी प्रेरणा देत राहील, आत्मविश्वास आणखीन प्रबळ करीत राहील असे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त नाशिकचे सपोनि गुलाबराव सोनार यांनी म्हटले आहे .

नाशिकचे सिंघम समजले जाणारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाबराव प्रभाकर सोनार यांचा नुकताच सावळीविहीर फाट्यावर त्यांना राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल पोलीसमित्रपरिवार, ग्रामस्थ, पत्रकार व तालुका शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात येवून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. 
सद रक्षणाय!, खल निग्रहणाय!या पोलीस दलाच्या ब्रीद वाक्याप्रमाणे प्रामाणिक, इमानदारपणे व कर्तव्यतत्पर, शिस्तबद्ध असे नाशिक येथे पोलीस दलात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असणारे व संपूर्ण नाशिक जिल्ह्यात सिंघम म्हणून समजले जाणारे गुलाबराव सोनार हे नुकतेच सावळीविहीर फाटा येथे आले असता त्यांचा पोलीस मित्रांकडून सत्कार करण्यात आला.व त्यांचे अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या समवेत असणारे पोलीस अधिकारी मोहिते साहेब, पठाण साहेब, त्याचप्रमाणे इतर पोलीस अधिकारी यांचाही शाल देऊन सत्कार करण्यात आला. गुलाबराव सोनार हे पोलिस अधिकारी नाशिक व परिसरामध्ये सिंघम म्हणून ओळखले जातात. पोलीस दलात त्यांनी प्रामाणिक इमानदारीने काम करत अनेक आरोपींना जेरबंद केले आहे. त्यांच्या या धडकेबाज पोलिसी कामगिरीची दखल राज्याने , देशाने घेवून त्यांना 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी पोलीस दलातील सर्वोच्च राष्ट्रपती पदक जाहीर झाले. त्यांना हा मोठा सन्मान, पुरस्कार जाहीर होताच पोलीस दलात व पोलीस मित्र परिवारात मोठा आनंद निर्माण झाला होता. नुकतेच ते कामानिमित्त या परिसरात आले असता त्यांची सावळी विहीर फाटा येथे पोलीसमित्र
परिवाराकडून तसेच शिवसेनेचे तालुकाप्रमुख संदीप रमेश विघे यांच्या कडून गुलाबराव सोनार यांचा राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला व मनापासून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या समवेत असणाऱ्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांचाही सत्कार करून त्यांचेही अभिनंदन करून यापुढे असेच धडाकेबाज पोलिसी कार्य आपल्या हातून होत राहो अशा त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पत्रकार राजेंद्र गडकरी यांनी गुलाबराव सोनार यांना राष्ट्रपती पदक हा मोठा सन्मान पुरस्कार मिळाला. तसेच त्यांनी येथे येऊन हा छोटाखाणी सत्कार स्वीकारला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करत पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. तर राष्ट्रपती पदक प्राप्त गुलाबराव सोनार यांनी पोलीस मित्र परिवाराकडून हा माझा छोटाखानी सत्कार केला ‌.त्यामुळे यापुढेही आणखी धडाकेबाज कामगिरी करण्याची त्यातून एक नवी प्रेरणा मिळत जाते. असे सांगत माझ्या व माझ्या समवेत असणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांचा येथे हा छोटाखाणी सत्कार समारंभ ठेवून आमचे अभिनंदन केले. त्याबद्दल सर्व मित्र परिवाराचे आभार मानले. यावेळी राहता तालुका शिवसेना प्रमुख संदीप रमेश विघे, युवा सेनेचे किरण जपे,एड. संजय वाणी, डॉ. शरद भदे, पत्रकार राजेंद्र गडकरी,
जालिंदर गुंजाळ, बाळू गुंजाळ, ढवळे सर, बाळासाहेब औटी, रूईचे कराटे प्रशिक्षक पठाण भाई, आदींसह पोलीस मित्रपरिवार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments