शिर्डी (प्रतिनिधी)- दिल्ली येथे ५ ते ८ ऑक्टोबर दरम्यान आयोजित 'IUKL वर्ल्ड केटलबेल चॅम्पियनशिप २०२६'* या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत श्री साईबाबा शैक्षणिक संकुलाच्या खेळाडूंनी ५ सुवर्ण, ४ रौप्य आणि ३ कांस्य अशी एकूण १२ पदके जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. या जागतिक स्पर्धेत यजमान भारतासह रशिया, अमेरिका, थायलंड, ऑस्ट्रेलिया, उझबेकिस्तान, इंग्लंड, मंगोलिया, फ्रान्स, पोलंड, दक्षिण कोरिया आणि सिंगापूर अशा एकूण १२ देशांतील ३०२ खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
पदक विजेते खेळाडू व प्राप्त पदकेः* --
ओंकार कोल्हे – २ सुवर्ण आणि १ रौप्यपदक
अनिकेत पायमोडे – १ सुवर्ण आणि १ रौप्यपदक
साई चौधरी – १ सुवर्णपदक
श्रुती उपाध्ये – १ सुवर्णपदक
हुजेब मनियार – १ रौप्यपदक
आराध्या ढेंबरे – १ रौप्यपदक
तुषार साकट – १ कांस्यपदक
पवन बोधके – १ कांस्यपदक
सुनील जाधव – १ कांस्यपदक
या सुवर्ण कामगिरीसोबतच संस्थानचे क्रीडा संचालक डॉ. विक्रम सातपुते यांनी इंटरनॅशनल युनियन ऑफ केटलबेल लिफ्टिंग (IUKL) सर्टिफिकेशन यशस्वीरीत्या पूर्ण केले. खेळाडूंच्या या यशाबद्दल श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे व सर्व प्रशासकीय अधिकारी यांनी संस्थानचे क्रीडा संचालक व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
0 Comments