राहाता तालुका प्रतिनिधी
सरकारने शेतकऱ्यांचा अंळत न पाहता सरसकट एकरी खरीप पिंकाना 50 हाजार व फळबागा ऊस पिंकाना एकरी एक लाख रुपये तातडीने दुष्काळ निधी बॅंक खात्या वर्ग करावा असी मागणी अहिल्यानगर जिल्हा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शेळके यांनी एका पत्रकाद्धारे केली आहे. पत्रकात शेळके यांनी म्हटले आहे की अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले असताना अनेक कागद पत्र शेतकऱ्यांकडून गोळा करत आहे त्यात अनेक शेतकरी यांचे हे फोटो काढताना ऍप मध्ये दाखवत नाही त्यामुळे ई पिक पाहणी होत नाही महसूल व कृर्षी विभागाकडे सर्व डाटा असंताना विनाकारण शेतकरी यांची ससेहोलपट आहे तरी शेतकऱ्यांच्या आट अ उतारे प्रमाणे सरसकट खरीप पिकास एकरी पन्नास हजार रुपये व ऊस व फळबागा देखील जळाल्या आहे यास एकरी एक लाख रुपये दुष्काळ निधी तातडीने देऊन जनवरासाठी चारा रूपी मदत करावी या दुष्काळाने शेतकरी किमान तीन वर्ष तग धरू शकत नाही तसेच शेतमजूरांना शेतात काम नसल्याने रोजगार हमी अंर्तगत कामे सुरू करावे असे पत्रकात शेळके यांनी म्हटले आहे
0 Comments