इंडिया आघाडीच्या नेत्यांना देशाची घटना आणि कायदे मान्य नाहीत.संविधानिक संस्थांवर त्यांचा विश्वास नाही.
निवडणूक आयोगाच्या विरोधात त्यांनी सुरू केलेले आंदोलन फक्त देशात अराजक निर्माण करण्यासाठी असल्याचा आरोप जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
माध्यमाशी बोलतांना मंत्री विखे पाटील म्हणाले की,जनाधार गमावलेल्या लोकांची ही आंदोलन असून निवडणुकांमध्ये पराभव झाल्यामुळे फक्त अस्तित्व दाखविण्यासाठी सुरू असलेली धडपड असल्याची टिका त्यांनी केली.
यापुर्वी काॅग्रेस नेते राहूल गांधी यांनी परदेशात जावून देशाच्या संविधानिक संस्थाचा वेळोवेळी अपमान केला याची आठवण करून देत, जनतेचे कोणतेही पाठबळ इंडीया आघाडीच्या मागे नसल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आंदोलनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय विद्यार्थ्याशी चर्चा करून प्रश्नाबाबत मार्ग काढला आहे.मात्र काहींना केवळ विद्यार्थ्याच्या प्रश्नाचे राजकीय भांडवल करायचे आहेत. यासंदर्भात विद्यार्थ्यांनीच आता विचार करण्याची आवश्यकता असल्याचा सल्ला मंत्री विखे पाटील यांनी दिला.@सर्व
0 Comments