राहाता तालुका प्रतिनिधी
पंचगंगा साखर कारखान्यासारखे राज्यातील व अहिल्यानगर जिल्ह्यतील सहकारी साखर कारखान्याने धाडस दाखवावे असे मत अहिल्यानगर जिल्हा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शेळके मांडले आहे पत्रकात शेळके यांनी म्हटले आहे की गेल्या अनेक वर्षापासून साखर कारखानदार ऊस उत्पादक शेतकरी यांच्या ऊसाचे वजनाचे काटे मारून रिकव्हरी कमी दाखवून लूट करत आहे मागील वर्षी शेतकऱ्यांनी खाजगी काटेवर वजन करुन पाठवले त्यात एक टॅक्टर मागे दोन अडीच टनाचा फरक पडला यावेळी शेतकरी संघटनेने अंदोलन केले व ऊस उत्पादक शेतकरी यांना न्याय मिळविण्यासाठी ऊसाचे वजन हे त्या गावातील खाजगी काटेवर करावे अशी मागणी केली चालु गळीत हंगामात काटे चेक करण्यासाठी काही आधीकारी व त्या तालुक्यातील शेतकरी प्रतीनीधी असे पथक साखर आयुक्त यांने नेमले जाईल असे जाहीर केले पंरतु सरकार मध्ये बहुतेक साखर कारखानदार आमदार खासदार मंत्री आहे ते त्या पथकामध्ये आपले न बोलणारे शेतकरी प्रतीनीधी देण्यासाठी आग्रही राहतील पंरतु जे शेतकरी संघटनेचे कार्यक्रर्ते नेहमी ऊसाला भाव मिळवा या प्रश्नासाठी अंदोलन करतात असे पथकात सहभागी करावे तरच न्याय मिळेल असे शेळके यांनी म्हटले आहे अन्यथा प्रत्येक कारखान्याने खाजगी काटे करण्यास परवानगी ध्यावी असी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली यावर्षी राज्यात मैठा दुष्काळामुळे ऊस उत्पादन निम्मे घटले आहे साखर कारखानदार यांनी एकजुट करुन केंद्र सरकारने साखरेचे टेंडर भाव किमान 55 रूपये करावा असी मागणी करावी म्हणजे किमान 4500 रुपये प्रती टन शेतकऱ्यांना सहज देता येईल असे आव्हान विठ्ठलराव शेळके यांनी साखर कारखानदार केले आहे तरच किमान उत्पादन खर्च निघेल व दुष्काळामध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळवून दोन पैसे मिळतील तरी साखर कारखानदार यांनी जोपर्यंत सरकार किमान साखरेचे दर किमान 55 रुपये किलो करत नाही तोपर्यंत आम्ही साखर विकणार नाही असे निवेदन केंद्र सरकारला ध्यावे असे पत्रकात शेळके यांनी म्हटले आहे
0 Comments