तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत कविवर्य ना.धो. महानोर उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुलींची दमदार कामगिरी ----



दिलीप शिंदे 
सोयगाव -- संत ज्ञानेश्वर महाविद्यालय येथे दि.०९ शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या मैदानी स्पर्धेत वडगाव तिग्जी येथील कविवर्य श्री. ना. धो. महानोर उच्च माध्यमिक विद्यालयाच्या १९ वर्ष वयोगटातील मुलींनी १००,२०० व ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांक मिळवून दमदार कामगिरी केल्याने जिल्ह्यास्तरीय स्पर्धेस पात्र ठरले आहेत. 

धावण्याच्या शर्यतीत कीर्ती चंद्रकांत इंगळे (१०० मीटर), हर्षदा भगवान सोनवणे (२०० मीटर) व वैष्णवी दीपक सोनवणे (४०० मीटर) यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून निलक्षी सोपान जाधव (१०० मीटर), शारदा ज्ञानेश्वर बनकर (२०० मीटर) व संजना सुकलाल देशमुख (४०० मीटर) यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. खेळाडू मुलींच्या या यशाबद्दल माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य जे. व्ही.चव्हाण,
 प्राध्यापक वाय. टी. बोरसे, प्राध्यापिका कल्पना सोनवणे, 
नरेंद्र पाटील, एस. एस. पाटील, देसले, ललित मोरे, अजय सोनवणे सचिन देसले, राहुल महाजन, विकास परदेशी, विलास पाटील,
 पवन राठोड ,भगवान सुर्यवंशी ,देविदास राजपूत, मिराबाई काळे ,तुषार बोरसे, कल्पेश पाटील व शाळेतील कर्मचारी, विद्यार्थी व ग्रामस्थांनी खेळाडू मुलींचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मुलींना प्राध्यापक वाय.टी.बोरसे व प्राध्यापिका कल्पना सोनवणे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

Post a Comment

0 Comments