सोयगाव शहरात जीवामहाले जयंती उत्साहात साजरी




दिलीप शिंदे 
सोयगाव,-- येथील बसस्थानकासमोरील आशीर्वाद जेंट्स पार्लर येथे दि.०९ शुक्रवारी सकाळी वीर जीवामहाले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष कैलास काळे यांच्या हस्ते वीर जीवामहाले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

उपस्थितांनी जयघोष करीत वीर जीवामहाले यांच्या स्मृतींना उजाळा दिला.या वेळी सुनील गव्हांडे, मंगेश सोहनी, संजय मोरे, संतोष बोडखे, मयूर मनगटे दत्तू रोकडे, भगवान कोथळकर, अमोल निकम, आप्पा पंडित, ललित पंडित, देवेंद्र पंडित, भगवान पंडित, ईश्वर सैदाणे, पंकज जाधव, अनिस पठाण, संदीप सोहनी, गोपाल चौधरी, अमोल नेरपगारे यांच्यासह पत्रकार राजू दुतोंडे, ईश्वर इंगळे व विजय काळे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments