गोदावरी उजव्या कालव्याला सांडपाणी व्यवस्थापनेसाठी असणाऱ्या नाल्यांचे रुंदीकरण व
खोलीकरणाचे काम जलसंपदा विभागाने सुरू केल्यामुळे या नाल्यांच्या परिसरातील शेतकरी तसेच नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे व हा महत्त्वाचा व जिव्हाळ्याचा प्रश्न ना. राधाकृष्ण विखे पा. यांनी हाती घेतल्याने त्यांचे सावळीविहीर बुद्रुक व खुर्द, शिंगवे, कोकमठाण आदी ग्रामपंचायती व ग्रामस्थांमधून अभिनंदन होत असल्याचे अ.भा. सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब जनार्धन जपे यांनी म्हटले आहे.
गोदावरी उजव्या कालव्याला असणाऱ्या सर्व नाल्यांचे रुंदीकरण खोलीकरणाचे काम राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून सावळीविहीर येथील मैल 45 मधून जाणाऱ्या नाला क्रमांक 30 चे रुंदीकरण व खोलीकरणाचे काम सुरू झाले आहे. त्याचे उद्घाटन नुकतेच विविध मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी सा.वि.बु चे सरपंच ओमेश जपे,मा, सरपंच अशोकराव आगलावे, गणेश आगलावे, विकास जपे, सुनील साहेबराव आगलावे, सुनील जपे, सुधीर वर्पे, प्रभाकर जपे, दिलीप कापसे, बाळासाहेब विनायक जपे, शिंगव्याचे जनूकाका बर्गे, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी बाळासाहेब जपे पा.बोलताना म्हणाले की, जलसंपदा मंत्री ना. विखे पा. यांच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी उजव्या कालव्याचे व पोट चाऱ्यांचे रुंदीकरण व खोलीकरणासाठी सुमारे 196 कोटी रुपये मंजूर करून ही सर्व कामे उत्कृष्टपणे झाली आहेत. त्याचप्रमाणे गोदावरी डाव्या व उजव्या कालव्यांवर ठीक ठिकाणी सांडपाणी व्यवस्थापनेसाठी असणाऱ्या नाले (चर) यामध्ये मोठ्या प्रमाणात गवत ,गाळ, दगड ,गोटे ,चिखल साठला आहे. अनेक ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पाणी आले की नाल्यांच्या शेजारील शेतात तसेच वस्ती व आसपास हे पाणी शिरते .त्यामुळे पिकांचे व इतर मालमत्तेचे नुकसान होते. साठलेल्या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी सुटते.त्यामुळे या नाल्यांचे सांडपाणी व्यवस्थापन व्यवस्थित व्हावे म्हणून या नाल्यांचे रुंदीकरण, खोलीकरण करण्यात यावे अशी मागणी सावळीविहीर बुद्रुक व खुर्द तसेच शिंगवे, कोकमठाण आदी ग्रामपंचायतींची व शेतकऱ्यांची होती. हा महत्त्वाचा व जिव्हाळ्याचा प्रश्न जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पा. यांनी हाती घेऊन त्यास मंजुरी दिली व या नाल्यांचे रुंदीकरण व खोलीकरण करण्यात येत आहे. सावळीविहीर येथून जाणारा मैल 45 मधील नाला क्रमांक तिस( SKF-30) चे रुंदीकरण व खोलीकरणाचे कामही सुरू होत असून त्याचे उद्घाटन जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता शहाणे मॅडम, सहाय्यक अभियंता (श्रेणीएक) लव्हाट साहेब, वैद्य रावसाहेब व शिंदे भाऊसाहेब, यांच्या मार्गदर्शनाखाली
श्रीफळ वाढवून नुकतेच करण्यात आले आहे. यावेळी आनंदाने जलसंपदा मंत्री ना. विखे पा. यांचा जयजयकारही करण्यात आला. पेढे वाटण्यात आले.
यावेळी संजय आगलावे, सतीश वाघमारे,शरद गडकरी, राजेंद्र आरणे. बाळू गुंजाळ, आदींसह गावातील विविध संस्थांचे आजी, माजी पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.
0 Comments