बाभळेश्वर बस स्थानकात सिमेंट बेंचेस लोकअर्पण


बाभळेश्वर प्रतिनिधी 
जेष्ठ नागरिकांनी दिले सिमेंट बेंच बाभळेश्वर जेष्ठ नागरिकांनी मोठया उदार अंतकरणातून प्रवासी जनतेकरिता पाच सिमेंट बेंच दिले असून त्याचा लोकार्पण सोहळा गांधी जयंती च्या दिवशी साजरा झाला .

अध्यक्ष स्थानी जेष्ठ नेते तुकाराम पाटील बेंद्रे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच बाळासाहेब बेंद्रे डॉ अशोक जेजुरकर आरिफ शेख प्राचार्य तांबे क्रीडा शिक्षक गागरे इत्यादी उपस्थित होते जेष्ठ नागरिक संघ प्रमुख तान्हाजी बेंद्रे यांनी कार्यक्रम हेतू सांगितला यावेळी माजी सैनिक भानुदास गाडेकर,सीताराम अरंगाळे, मेजर पाटील व दहा सफाई कामगारांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी प्रमोद तोरणे बापू भोसले तुकाराम बेंद्रे पाटील यांची भाषणे झाली सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदिका गायत्री म्हस्के यांनी केले यावेळी रमेश क्षीरसागर शिवा पठारे आरिफ शेख निवृत्ती बनसोडे ज्ञानदेव बेंद्रे बापूसाहेब बेंद्रे मच्छिन्द्र गोरे अयुब भाई शेख बाळू सगळगिले धोंडीराम दरेकर इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते

Post a Comment

0 Comments