जिल्ह्यातील पशुधनाची एकूण संख्या, लागणारा चारा आणि भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी अधिक सखोल नियोजन होण्याची आवश्यकता असून पशुसंवर्धन विभागाने तालुकानिहाय याचा सविस्तर आढावा घेवून आराखडा तयार करण्याच्या सूचना जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.
श्रीगोंदा तालुक्यातील टंचाई परीस्थीतीचा आढावा मंत्री विखे पाटील यांनी घेतला.आ.विक्रमसिंह पाचपुते भगवान पाचपुते राजेंद्र नागवडे अतिरीक्त जिल्हाधिकारी शैलेंद्र हिंगे कुकडीच्या अधिक्षक अभियंता अलका अहीरराव कृषि अधिकारी सुधाकर बोराळे महावितरण कंपनीचे अभियंता पवार यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
श्रीगोंदा येथे टंचाई आढावा बैठकीत मंत्री विखे पाटील यांनी तालुक्यातील पशुधन आणि चारा नियोजनाबाबत पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या सादरीकरणावर नाराजी व्यक्त केली.लहान मोठे जनावरे आणि शेळी मेंढी यांची संख्या चार्याची गरज यामध्ये तफावत दिसत असल्याने पशुसंवर्धन विभागाने शेतकर्याकडे असलेले पशुधन त्यांच्याकडून उपलब्ध होणारा चारा आणि पशुधन आहे पण चारा नाही,मूरघास बनविणारे शेतकरी आशी आकडेवारी पुन्हा संकलित करण्यास सांगितले.पशुधनाची सांख्यिकी माहीती विभागाने संकलित केली असल्याने त्याची मदत होईल याकडे मंत्र्यांनी लक्ष वेधले.
वीज वितरण कंपनीने तालुक्यात मोठ्या संख्येने सौर कृषी पंप दिले.तरीही भारनियमानाचे प्रमाण कमी का होत नाही असा प्रश्न विखे पाटील यांनी उपस्थित
केला.तालुक्यात असलेले फिडर त्यावर येत असलेला भार याचाही आढावा घेवून घेण्याच्या सूचना त्यांनी महावितरणच्या अधिकार्यांना दिल्या.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या नऊ पैकी आठ योजनांची काम पन्नास टक्के एवढीच झाली आहेत.यासाठी किती निधीची आवश्यकता आहे त्याचा प्रस्तावही सादर करण्याचे निर्देश दिले.
टॅकरच्या नियोजनासाठी तहसिलदार गटविकास अधिकारी ग्रामसेवक आणि तलाठी यांनी वस्तूनिष्ठ माहीतीचा आरखडा पुन्हा सादर करावा भविष्यातील पाणी टंचाई लक्षात घेवून कुकडी आणि सीना लाभक्षेत्रात किती टॅकरची आवश्यकता आहे त्याचे वेळापत्रक आणि अॅप मध्ये माहीती भरावी.
पीकविमा योजनेपासून शेतकरी दूर जात आहे.मंत्री विखे पाटील यांनी मागील वर्षी शेतकर्याना मिळालेला विमा योजनेचा लाभ आणि आता योजनेत कमी झालेली शैतकर्यांची संख्या यामध्ये फरक असल्याने कृषी विभागाने योजनेच्या संदर्भात अधिक प्रसार प्रचार करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
दुष्काळी परीस्थीतीच्या पार्श्वभूमीवर लोकांचा रोष खूप मोठा आहे.मात्र इतर योजनांचा लाभ सुरू असल्याने नागरीकांना दिलासा मिळतो.मात्र आशा काळात सरकार आणि प्रशासनाची जबाबदारी ही समाजघटकांना आधार देण्याची आहे.अतिशय संवेदनशील आणि पारदर्शीपणे संकटात काम करा असे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले.
कोट
मंत्री विखे पाटील यांनी साकळाई योजनेला मंजूरी मिळवून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल उपस्थित शेतकर्यांनी त्यांचे आभार मानले.मात्र सिना धरणातून आवर्तन देण्याची मागणी केली.यासंर्भात पाण्याची उपलब्धता लक्षात घेवून शेतकरी हिताचा निर्णय करण्याची ग्वाही त्यांनी लाभधारक शेतकर्यांशी बोलतांना दिली.
0 Comments