कोणत्याही संस्थेवर संधी मिळाल्यानंतर त्या पदाधिकाऱ्यांच्या चांगल्या कामाला राजकारण म्हणून विरोध नको--डॉ. सुजयदादा विखे पा.
जिल्ह्यात सर्वात मोठ्या असणाऱ्या शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थान एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचा कारभार चांगला सुरू आहे. तो पुढे असाच सुरू राहील असा विश्वास व्यक्त करत 488 संस्थान कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय हा कोणी म्हणत असेल की तो आमच्यामुळे झाला.पण तो साईबाबांच्या कृपेमुळे झाला आहे असे स्पष्ट मत युवा नेते डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांनी व्यक्त केले.
शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान एम्पलॉजी क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या दिवाळीशिधा भेट वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला साई संस्थांनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले, महांडुळे मॅडम, अतुल वाघ, उद्योजक भाऊसाहेब चौधरी, विजय कोते, शिर्डीच्या नगराध्यक्ष सौ जयश्रीताई थोरात, नगरसेवक, या संस्थेचे चेअरमन विठ्ठलराव पवार, व्हा. चेअरमन पोपटराव कोते आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री साई प्रतिमेचे पूजन व आरती करून प्रातिनिधिक स्वरूपात सभासदांना दिवाळी शिधा भेट वाटप करण्यात आली. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात डॉ.सुजयदादा विखे पाटील पुढे म्हणाले की, साई संस्थांनच्या 488 कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला. मात्र आता हा न्याय आपल्यामुळेच मिळाला हे श्रेय घेण्यासाठी आता काहीजण पुढे येत आहेत. काहीनी हारतुरे घेत फटाके वाजवले आहे. अशी कोपरखिळी मारत राजकारणात प्रत्येकाला श्रेय पाहिजे असते. पण आपण हे सर्व श्रेय साईबाबांनाच देतो. राजकारणात केलेल्या कामाचे फळ मतदानातून मिळत असतं. राहता तालुका आमचा परिवार आहे . आमचा स्वार्थ या भागाच्या कल्याणासाठी आहे. जोपर्यंत साईंच्या मनात आहे तोपर्यंत आम्ही त्यासाठी लढत राहणार आहे व हटणार नाही. असे सांगत श्री साईबाबा संस्थान वर लवकरच विश्वस्त मंडळ येणे गरजेचे आहे. सध्या तरी प्रशासकीय सदस्य कमिटी ही चांगलं काम करत आहे. मात्र काही निर्णय घेण्यासाठी विश्वस्त मंडळाची गरज असल्याने ते लवकरच येईल अशी अपेक्षा व्यक्त करत शिर्डी नगरपालिकेच्या माध्यमातून शिर्डीत स्वच्छ शहर, गुन्हेगारी मुक्त शहर होत आहे. कुंभमेळ्याच्या माध्यमातून 50 कोटी तर संस्थांनच्या माध्यमातून 30 कोटी ची कामे येथे सुरू होणार आहेत. स्टेडियम, नाट्यगृह, थीम पार्क होणार आहे. असे सांगत संस्थान कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत बोलताना डॉ. सुजय दादा विखे पा. म्हणाले की, संस्थानच्या वेगवेगळ्या विश्वस्त मंडळाच्या काळात वेगवेगळ्या झालेल्या निर्णयामुळे अनेक प्रश्न गुंतागुंतीचे होत गेले. काही कर्मचाऱ्याना सारखा अनुभव व सारखीच शैक्षणिक पात्रता असूनही या कर्मचाऱ्यांच्या वेतनात तफावत आहे. यावर विचार होणे गरजेचे असून साई संस्थान प्रशासनावर कामाचा मोठा ताण आहे .मात्र तरीही कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांचे प्रश्न एकत्रितपणे विचारविनिमय करून टप्प्याटप्प्याने सोडवण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी त्यांनी म्हटले आहे. व संस्थांनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर साहेब यांचे कामही चांगले असल्याचे यावेळी विखे पाटील म्हणाले.
प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा ह्या वाढत असतात. काहीजण तर प्रथम नोकरी मागायला, नंतर आऊट सोर्स मध्ये घ्यायला नंतर कायम करावं म्हणून तर नंतर फरकही मिळावा म्हणून आपल्याकडे मागण्या करत असतात व नेतृत्वाकडे मागण्या किंवा काम आणणे साहजिकच नागरिकांचा, कार्यकर्त्यांचा हक्क आहे. व ते करण्याचे नेतृत्वाचेही काम आहे. असं सांगत साई संस्थांन कर्मचाऱ्यांमध्ये राजकारण नको. या संस्थेत साईंचाच सर्वांना पगार आहे. त्यामुळे आरोप प्रत्यारोप नको, सध्याच्या संचालक मंडळाला या जिल्ह्यातील सर्वात मोठ्या संस्थेचे काम करण्याची संधी मिळाली. चेअरमन विठ्ठल पवार व त्यांच्या संचालक मंडळाचे कामही चांगले आहे. त्यांना चांगला कारभार करू द्या , कोणत्याही संस्थेवर ज्यांना संधी मिळते त्यांना काम करू दिले पाहिजे. असे सांगत येणाऱ्या दिवाळीसाठी आमच्या विखे परिवाराकडून सर्वांना शुभेच्छा असल्याचे यावेळी युवा नेते डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांनी म्हटले.
यावेळी साई संस्थान कर्मचारी सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार यांनी सांगितले की, श्री साईबाबांचा आशीर्वाद व सुजय दादांचा विश्वास आणि साईंच्या श्रद्धा व सबुरी या मंत्रावर संस्थेचा कारभार काटकसर करत, पारदर्शीपणाने सुरू असून कुणी कितीही सभासदांमध्ये सोशल मीडियाद्वारे बुद्धिभेद किंवा अफवा पसरण्याचा प्रयत्न केला तरी गाडीलकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तिकडे लक्ष न देता काम करत राहणे, या मार्गावर आपण काम करत असून ही संस्था वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबवत असते. सभासदांना नुकताच संस्थेमार्फत डिव्हीडंट वर्ग करण्यात आला आहे. तसेच 50 किलो साखर, पंधरा किलो गोड तेल, एक किलो फरसाण व एक किलो मिठाई दिवाळी भेट म्हणून सभासदांना देण्यात येणार आहे. संस्थेने सभासदांचा विमा तसेच इतर अनेक उपक्रम सभासदांसाठी राबवले आहे, संस्थेत परिवर्तन झाल्यानंतर अमुलाग्र बदल झाला आहे. लवकरच संस्थेचे कार्यालय होईल असे सांगत संस्थांनने सेवा प्रवेश नियम मंजूर केला असून १०/२०/चा फरकही मिळाला आहे. काही जण बाकी आहे त्यांचाही प्रश्न मार्गी लागेल . असे सांगत सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला संस्थेचे संचालक महादू कांदळकर ,कृष्णा आरणे, भाऊसाहेब कोकाटे, संभाजी तुरकणे, देविदास जगताप, विनोद कोते, मिलिंद दुनबळे, तुळशीराम पवार, रवींद्र गायकवाड, भाऊसाहेब लवांडे, इकबाल तांबोळी, सौ सुनंदा जगताप, सौ. लता बारसे, रंभाजी गागरे, सचिव भाऊसाहेब लबडे, सहसचिव बाबासाहेब अनर्थे, सहाय्यक सहसचिव संभाजी कोते, आदीसह संस्थेचे अधिकारी, कर्मचारी ,संस्थेचे सभासद यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments