लक्ष्मीवाडी येथील शिवछत्रपती युवा संघटनेच्या नवरात्र उत्सवाची उत्साहात सांगता!

शिर्डी (प्रतिनिधी)-
राहाता तालुक्यातील लक्ष्मीवाडी येथील शिवछत्रपती युवा संघटनेच्या नवरात्रोत्सवाची नुकतीच उत्साहात सांगता झाली. 
  या नवरात्रोत्सवाचे हे 33 वे वर्ष होते. घटस्थापने पासून तर विजयादशमी पर्यंत येथे नवरात्रीचा मोठा उत्सव व विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. दिलीप जपे यांच्या घरालगत असणाऱ्या पटांगणात भव्य मंडपात श्री दुर्गे मातेची प्रतिष्ठापना करून दररोज सकाळ संध्याकाळ आरती, पूजा, दररोज श्री दुर्गा सप्तशती पाठ, रात्री गरबा दांडिया चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात होत होता. य नवरात्र उत्सव काळामध्ये येथे ज्यांनी गरबा दांडिया मध्ये दररोज हजेरी लावून दांडिया स्पर्धेत सहभाग घेतला. त्यांना लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठी काढून लकी ड्रॉ द्वारे बक्षीसे देण्यात आली. सायकल, इस्त्री, ओव्हन, सुटकेस, एलईडी टीव्ही, वाशिंग मशीन, व रोख स्वरूपातही बक्षीसे देण्यात आली. दांडिया खेळणाऱ्यांचा उत्साह वाढवा म्हणून ही बक्षीसे व पारितोषिके मंडळातर्फे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दांडिया स्पर्धकांना देण्यात आली. असे यावेळी या शिवछत्रपती नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष वैभव दिलीप शेठ बाठीया यांनी सांगितले. तर सुमारे 33 वर्षांपूर्वी स्व. धनराजजी आसाराम बाठीया, स्व. ईश्वर भाई राजदे, स्व. भगवान देहरकर, स्व. विनायकराव आगलावे, स्व. सावळा साहेब, तसेच मोहनराव मोरे, दिलीप शेठ बाठीया वाल्मीक बाठीया तसेच दीक्षित परिवार संगघी परिवार, लोढा भावसार, शहाणे, वाघ ,कोठारी , दोडिया ,सावंत आदी सर्व परिवारातून या नवरात्र उत्सवाला स्व. बाळासाहेब विखे पाटील तसेच नामदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री नामदार अण्णासाहेब म्हस्के पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात करण्यात आली असून 
आजतागायत हे नवरात्र उत्सव मंडळ मोठ्या उत्साहाने दरवर्षी नवरात्र उत्सव साजरा करत असते‌. विविध कार्यक्रम घेत असतात. असे या मंडळाचे सर्वेसर्वा दिलीप शेठ बाठीया यांनी सांगितले.
बुधवारी सायंकाळी शिवछत्रपती युवा नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने भाविकांसाठी दाल बाटी महाप्रसादचा कार्यक्रम झाला. या सर्व कार्यक्रमांचा मोठ्या संख्येने भाविकांनी, महिलांनी लाभ घेतला. हा नवरात्र उत्सव व सर्व कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्या कामी दिलीप शेठ बाठीया, वैभव बाठीया , भारत आगलावे,सर्व बाठीया परिवार तसेच शिवछत्रपती युवा मंडळाच्या सर्व तरुणांनी आणि परिसरातील सर्व भाविक भक्तांनी मोठे परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments