सोयगावमध्ये पदवीधर मतदार जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांचे गीत व पथनाट्याद्वारे प्रबोधन----




दिलीप शिंदे 
सोयगाव : आगामी पदवीधर मतदार जनजागृतीच्या अनुषंगाने सोयगाव स्वीप कक्षामार्फत मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सोयगाव येथील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत मतदार जनजागृती गीत व पथनाट्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.गटशिक्षणाधिकारी अक्षय धंदर, सोयगावचे केंद्रप्रमुख फिरोज तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक किरणकुमार पाटील व शिक्षिका मंगला बोरसे यांनी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने हा जनजागृतीपर कार्यक्रम सादर केला.
 सोयगाव तहसील कार्यालयातील कृषी विभाग व महसूल विभागाच्या पदवीधर मतदार कर्मचाऱ्यांच्या बैठकीदरम्यान तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक, सोयगाव येथे मतदार जनजागृती करण्यात आली.मतदानाचे महत्त्व, मतदार नोंदणी आणि लोकशाही प्रक्रियेत मतदारांचा सक्रिय सहभाग याविषयी विद्यार्थ्यांनी गीत व पथनाट्याच्या माध्यमातून प्रभावी संदेश दिला. लोकशाही बळकट करण्यासाठी पात्र मतदारांनी मतदार नोंदणी करून मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन या उपक्रमातून करण्यात आले.यावेळी सोयगाव तालुक्याचे गटविकास अधिकारी शिवाजी यमुलवाड, तालुका कृषीअधिकारी भारत कासार,नायब तहसीलदार संभाजी देशमुख यांच्यासह कृषी विभाग व तहसील कार्यालयातील पदवीधर मतदार कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या जनजागृतीपर कार्यक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मतदार जनजागृतीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम लोकशाहीविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी फिरोज तडवी,किरण पाटील, मंगला बोरसे, बिलाल बागवान यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments