बाभळेश्वर( प्रतिनिधी)
बाभळेश्वर येथील अमर धाम सुशोभीकरण अंतर्गत जेष्ठ नागरिक संघटना याच्या विद्यमाने सात सिमेंट बाके लोकांर्पण सोहळा आज दिनांक 20 ऑक्टोबर रोजी जेष्ठ नागरिक संघटना प्रमुख तान्हाजी पाटील बेंद्रे यांच्या संकल्पनेतून संपन्न झाला या प्रसंगी माजी सरपंच बाळासाहेब बेंद्रे पाटील माजी सरपंच राजेंद्र म्हस्के पाटील पंचायत समिती माजी उपसभापती बबलू म्हस्के पाटील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकर बेंद्रे पाटील यांच्या उपस्थिती पार पडला .या वेळी शंकर रोकडे आरिफ शेख दिलीप खर्डे भालेकर पेंटर गोकुळ बेंद्रे साहेब राव शिंदे बाजीराव पठारे नानासाहेब शिंदे साई तुपे अंत्रे मंडप विलास सोनवणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी सिमेंट बाके देणाऱ्या दानशूर व्यक्ती चा सत्कार करण्यात आला तसेच अमर धाम मध्ये सेवा करणारे पती पत्नी चा सत्कार करण्यात आला यावेळी तान्हाजी बेंद्रे प्रमोद तोरणे शंकर रोकडे यांची भाषणे झाली अध्यक्ष स्थानी बाळासाहेब बेंद्रे हे होते.
0 Comments