निंबायती येथील आदिवासी समाजाच्या उपोषणाची माघार---




दिलीप शिंदे 
सोयगाव दि.१९-- आदिवासी समाजाच्या जागेवर केलेल्या अवैध अतिक्रमण साठी सुरू असलेले निंबायती येथील आदिवासी ग्रामस्थांचे आमरण उपोषण कारवाईच्या लेखी आश्वासनानंतर सोमवारी सायंकाळी सात वाजता सहाव्या दिवशी माघारी झाले आहे.

 तालुक्यातील निंबायती येथील आदिवासी समाजाच्या बखळ जागेवरील अवैध अतिक्रमण बांधकाम काढण्यात यावे तसेच ही जागा समाज उपयोगात आणण्याच्या मागणीसाठी निंबायती येथील आदवासी ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालय सोयगाव समोर दि.१५ गुरुवार पासून आमरण उपोषण सुरू केले होते अखेर सोमवारी सहाव्या दिवशी तहसीलदार मनीषा मेने पोलीस निरीक्षक दिनकर गोरे यांनी मध्यस्थी करून गटविकास अधिकारी यांनी दिलेल्या अतिक्रमण धारकांविरुद्ध कारवाई करण्याची लेखी आश्वासन नंतर सोमवारी सायंकाळी सात वाजता उपोषणाची माघार झाली आहे.
निंबायाती येथील आदिवासी समाजाच्या ग्रामस्थांनी वेळोवेळी ग्रामपचायत कार्यालय निंबायती व पंचायत समिती सोयगांव येथे अर्ज देऊन आदिवासी मंगल कार्यालय व शादी खाना ग्राऊड व धार्मिक स्थळ मस्जिदच्या रहदारी समोरिल ग्रामपंचायत हद्दीतील ३०×४० च्या बखळ जागेवर आदिवाशी समाज लग्न समारंभ व इतर कार्यक्रमासाठी स्वयंपाकासाठी वापरत होते.परंतु या आदिवासी समाजाच्या जागेवर एका खासगी इसमाने अतिक्रमण करून बांधकाम सुरू केल्याची तक्रार आदिवासी समाजाने केली होती. दरम्यान ग्रामपंचायतच्या मालकीची बखळ जागेवर अतिक्रमण करून सुरु असलेल्या बांधकामाची चौकशी करण्याच्या मागणीसाठी जालेखा महम्मद तडवी यांचेसह अलिबाबा तडवी,मोहसिन तडवी आदींसह आदिवासी आमरण उपोषणाला बसले होते सोमवारी गटविकास अधिकारी यांनी संबंधित अतिक्रमण केलेल्या जागेची चौकशी करून बांधकाम बंद करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्या मुळे सायंकाळी सात वाजता उपोषण मागे घेण्यात आले आहे तहसीलदार मनीषा मेने,पोलीस निरीक्षक दिनकर गोरे,प्रशासक अशोक दौड,अधिक्षक आनंद पैठणे, संतोष पडघम,पोलीस कुणाल जाधव,आदींची यावेळी उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments