रायफल शूटिंग स्पर्धेत उन्नती वर्पे जिल्ह्यात प्रथम



लोहगाव (वार्ताहर): १९ वर्ष वयोगटातील पिपसाईट एयर रायफल शूटिंग जिल्हास्तरीय स्पर्धेत कु. उन्नती संजय वर्पे हिने प्रथम क्रमांकासह गोल्ड मेडल प्राप्त केले आहे. 
क्रीडा व युवक सेवा संचनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर आणि त्रिमूर्ती शैक्षणिक व क्रीडा संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या १९ वर्षे वयोगटातील पिपसाइट एअर रायफल शूटिंग स्पर्धा नुकत्याच त्रिमूर्ती क्रीडा संकुल, नेवासा फाटा येथे संपन्न झाल्या. 
या स्पर्धेत प्रवरानगर येथील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावी विज्ञान वर्गातील विद्यार्थिनी कु.उन्नती संजय वर्पे हिने उत्कृष्ट नेमबाजी करून जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. तिची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
तिच्या या यशाबद्दल जनरल बॉडी सदस्य रावसाहेब म्हस्के, उपाध्यक्ष अरुण कडू, जनरल बॉडी सदस्य एकनाथराव घोगरे, जनरल बॉडी सदस्य माजी प्राचार्य भिमराव आंधळे, प्राचार्य दिलीप डहाळे, मुख्याध्यापिका नलिनी जाधव, प्र.उपप्राचार्य संजय डुबे, पर्यवेक्षिका संगीता सांगळे, देवेश आहेर, डॉ. शरद दुधाट, माधुरी वडघुले, संजय ठाकरे, विलास गभाले, नरेंद्र ठाकरे, बाबासाहेब अंत्रे यांच्यासह सर्व शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे. तिला क्रीडाशिक्षक शिवप्रसाद जंगम यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments