शेवगाव ,पाथर्डी तालुक्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा पाणी आणि चारा उपलब्धतेबाबतचे अचूक नियोजन सादर करावे -पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील



शिर्डी ,दि.२ (उमाका) शेवगाव आणि पाथर्डी या  तालुक्यातील  गावामध्ये टँकरद्वारे करण्यात आलेल्या पाणीपुरवठ्याचे नियोजन तसेच गावनिहाय  पशुधनासाठी उपलब्ध असणाऱ्या चाऱ्याचे सर्वेक्षण करून नियोजना करण्याबाबतचे  निर्देश   पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी तालुका प्रशासनास दिले .

शेवगाव येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय मध्ये शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील टंचाई परिस्थिती आढावा बैठकीच्या आयोजन करण्यात आले होते
 
या बैठकीस शेवगावच्या आमदार मोनिकाताई राजळे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी अपर जिल्हाधिकारी  शैलेंद्र हिंगे, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता अरुण नाईक, कार्यकारी अभियंता सुनंदा जगताप, पल्लवी जगताप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे शेवगाव पाथर्डी तालुक्यातील तहसीलदार तसेच पाणीपुरवठा,कृषी  आणि पशुसंवर्धन विभागाचे विभाग प्रमुख या बैठकीस उपस्थित होते. 
शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांचे पशुधन वाचवण्यासाठी आवश्यक असणारा चारा आणि पाणी उपलब्धता बाबतचे नियोजन गावनिहाय दोन्ही तालुक्यांतील संबंधित विभागाने तयार करावे. शेत पिकाचे नुकसान झालेल्या सर्व गावात पंचनामे सरसकट करून मदतीसाठीचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. ज्या गावांमध्ये  टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो त्याचे वितरण वेळेत आणि ठरवून दिलेल्या प्रमाणात होते की नाही याबाबतची ही पाणीपुरवठा , नगरपालिका आणि जिल्हा परिषदचे अंतर्गत असणाऱ्या संबंधित यंत्रणेने करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. 

दोन्ही तालुक्यात उपलब्ध असणारा चारा हा पीक पेऱ्यानुसार अंदाजीत आकडेवारी प्रशासनाने सादर केली असली तरी प्रत्यक्षात पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे चारा  पिकाचे उत्पादन कमी प्रमाणात झाले आहे. जो उपलब्ध चारा आहे त्याचे नियोजन करण्यासाठी आकडेवारी महत्त्वपूर्ण असून याद्वारे शेतकऱ्यांच्या पशुधनाच्या मदतीसाठी अन्य नियोजन करण्यास प्रशासनास मदत होणार असल्याचे पालकमंत्री विखे पाटील यांनी  सांगितले .

*ताजनापुर उपसा सिंचन प्रकल्प टप्पा तीनसाठी   भरीव निधी उपलब्ध* 
शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यात ताजनापुर उपसा सिंचन प्रकल्प अंतर्गत टप्पा एक मधून सूक्ष्म सिंचनासाठी  उपलब्ध करून देण्यात येत असून टप्पा दोन मधील पाणीपुरवठा  करण्यात येणाऱ्या मधील पंप हाऊस आणि त्यावर मोटर बसवून पूर्ण काम करण्यासाठी  निधी उपलब्ध करून दिला आहे. डिसेंबर २०२६अखेर पर्यंत टप्पा दोन चे काम पूर्ण  करण्यात येणार असून टप्पा तीन अंतर्गत पाथर्डी तालुक्यातील उर्वरित गावांना शिल्लक असलेले पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शासनामार्फत पण ५०० कोटी रुपयांचा खर्च  असून तो मंजूर करण्यात येणार आहे. यासाठी प्राथमिक स्वरूपात एक कोटी रुपयांचा निधी सर्वेक्षण कामासाठी मंजूर करण्यात आल्याचे राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. ताजनापूर उपसा सिंचन प्रकल्प टप्पा तीन मधून उर्वरित गावांनाही पाणी मिळणार असल्याचे ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

*पाईपलाईन फोडून पाणी वापर करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा*

पिण्यासाठी आणि सिंचनासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याचे सुयोग्य नियोजन हे जलसंपदा विभागामार्फत करण्यात आले आहे .पण मध्येच अनधिकृतपणे पाईपलाईन फोडून त्यातून अतिरिक्त पाणी वापर करणे तसेच पाण्याचा अपव्यय केल्याबद्दल संबंधित व्यक्ती विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागास दिले .यामुळे सर्व घटकांना समान पाणी वाटप होत नसल्याने नागरिकांत असंतोष निर्माण होऊ नये  तसेच दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये पाण्याच्या सुयोग्य नियोजन करण्यासाठी ही कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यापुढे राज्यात कुठल्याही उपसा सिंचन अंतर्गत असणाऱ्या पाईपलाईन फोडून पाण्याचा अनधिकृत पाणी वापर करणाऱ्या व्यक्तींना विरोधात गुन्हे दाखल करण्याबाबत जलसंपदा विभागात सूचित करण्यात आले.

शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील शेतकरी बांधवांनी केलेल्या  पाणीपुरवठा, सिंचन व्यवस्था चाऱ्याबाबतच्या मागणी विषयीची निवेदन ऐकून घेऊन त्याबाबत संबंधित विभागाला दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर संवेदनशीलतेने काम करण्याचे आवाहन पालकमंत्री विखे पाटील यांनी केले.

Post a Comment

0 Comments