दिलीप शिंदे
सोयगाव दि.०२--सोयगाव-तालुक्यातील जरंडी ग्रामपंचायतीची शुक्रवारी दुपारी दोन वाजता विशेष ग्रामसभेत धिंगापूर धरणासह गारगोटी, चिमनापुर, आदी धरणातून सुरु असलेला अवैध पाणी उपसा बंद करून या धरणातील विनापरवाना असलेले सायफन, वीज पंप जप्त करण्याचा ठराव ग्रामस्थांनी ग्रामसभेत उपस्थित करून मंजूर करून घेतला दरम्यान आगामी काळात पिण्याच्या पाण्याची परिस्थिती बिकट होईल त्या अनुषंगाने धरण साठ्यातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवावे असाही ठराव घेण्यात आला.
जरंडी ग्रामपंचायतची प्रशासक अशोक दौड,सचिव संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी दुपारी दोन वाजता ग्रामसभा झाली यामध्ये दुष्काळी परिस्थिती वर चर्चा करण्यात येवून महिलांना शेतकरी प्रमाण पत्र,घनकचरा व्यवस्थापन, विविध विषयांवर चर्चा झाली त्यानंतर स्वप्नील बिरारे यांनी धरणातील अवैध पाणी उपसा बंद करून धरणातून विनापरवाना पानी उपसा सुरु असलेल्या वीज पंप, सायफन जप्त करावे असा ठराव मांडला ग्रामस्थांनी ठराव संमत केला यावेळी ग्रामसभेत कृषी विभागाच्या वतीने पर्यवेक्षक समाधान चौधरी यांनी दुष्काळा संदर्भात बाधित शेतकऱ्यांनी पंचनामे करून घ्यावे पंचनामा पथकांना योग्य सहकार्य करावे असे आवाहन केले महिला शेतकरी प्रमाणपत्र काढून घेण्यासाठी मार्गदर्शन केले यावेळी महिला बचत गटाच्या शालू पवार, सतिष बाविस्कर, कर्मचारी अंबु राठोड आदींसह ग्रामस्थांची उपस्थित होते.
चौकट;-धिंगापूर धरणातून सर्रासपणे पाण्याचा उपसा
दरम्यान धिंगापूर धरणात सायफन द्वारे व विनापरवाना वीज पंप टाकून पाण्याचा शेतीसाठी सर्रासपणे उपसा सुरू आहे ही बाब ग्रामसभेत निदर्शनास आणून दिली यावेळी प्रशासक अशोक दौड यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
0 Comments