टाकळीभान प्रतिनिधी : जपान येथे २०२६ यावर्षीच्या नुकत्याच पार पडलेल्या आशियाई कबड्डी स्पर्धेत भारतीय संघासाठी महत्वपूर्ण कामगिरी बजावत भारतीय संघाला सुवर्णपदक प्राप्त करून देणारा टाकळीभानचा भूमिपुत्र भारताचा स्टार कबड्डी खेळाडू असलम इनामदार याचे आशियाई कबड्डी स्पर्धा विजयानंतर मातृभूमी टाकळीभान मध्ये काल सायंकाळी ७ वाजता आगमन होताच गावातील क्रीडाप्रेमी, ग्रामस्थ मान्यवर यांच्यावतीने ढोल ताशांच्या गजरामध्ये व फटाक्यांच्या आतिषबाजी जल्लोषात स्वागत करण्यात आले. स्वागत सत्काराचे आयोजन आझाद क्रीडा मंडळ, ओन्ली साई क्रीडा मंडळ, शेतकरी संघटना टाकळीभान, राजेंद्र कोकणे मित्र मंडळ टाकळीभान, जय बजरंग तरुण मंडळ, सन्मित्र क्रीडा मंडळ, संविधान ग्रुप टाकळीभान, श्रीकृष्ण गोपाल संघटना, टाकळीभान यांच्यावतीने करण्यात आले होते. याप्रसंगी गावातील राजेंद्र कोकणे, माजी उपसरपंच भारत भवार, सर,प्राचार्य जयकर मगर,अर्जुन राऊत, अनिल बोडखे, बापूसाहेब पटारे,रवींद्र गाढे, यांनी शुभेच्छा दिल्या व असलम याचे त्याच्या नेत्र दीपक यशाबद्दल भरभरून सर्वांनी कौतुक व अभिनंदन केले,
याप्रसंगी गावातील ज्येष्ठ खेळाडू भैया पठाण, अनिल पटारे सर, कबड्डी प्रशिक्षक राहुल कोकणे, पो.वसीम इनामदार, नूर पठाण, विलास दाभाडे, ॲड धनराज कोकणे, ज्येष्ठ पत्रकार दिलीप लोखंडे,श्रीधर गाडे,आबासाहेब रणनवरे,बंडोपंत बोडखे,अमोल पटारे, गणेश इथापे महेश कचे,विश्व धावपटू भाऊसाहेब गव्हाणे,सुजित बोडखे, गोरक्षनाथ कोकणे, मेहराज इनामदार, अशोक शेंडे, राजेश जाधव,सुदाम पटारे, आदीसह मोठ्या संख्येने गावातील तरुण युवक खेळाडू ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments