टाकळीभान प्रतिनिधी :-टाकळीभान सेवा संस्थेचे कर्ज घेऊन थकित ठेवणाऱ्या व संस्थेला फसवणाऱ्यांवर कडक कायदेशिर कारवाई करणार आहे. तसेच कर्ज थकवणाऱ्या थकित सभासदांची यादी लवकरच फलकावर लावणार असल्याचा इशारा टाकळीभान सोसायटीचे चेअरमन राहुल पटारे यांनी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिला आहे.
यावेळी व्हा. चेअरमन सुनंदा कोकणे, ज्येष्ठ संचालक मंजाबापू थोरात,कारेगाव भागचे संचालक शिवाजी शिंदे ,उपसरपंच कानोबा खंडागळे, माजी उपसरपंच राजेंद्र कोकणे, ज्येष्ठ नेते विष्णुपंत खंडागळे,, माजी चेअरमन भाऊसाहेब मगर, मधुकर कोकणे, अॅड. राजेंद्र कापसे आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.
यावेळी चेअरमन पटारे म्हणाले. संस्थेच्यावतीने कृषी सेवा केंद्र, प्रक्रिया उद्योग, पेट्रोल पंप, दूध शितकरण केंद्र आदी शेतीपुरक उद्योग सुरु करण्याचे संचालक मंडळाचे धोरण आहे. संस्थेकडून कर्ज घेवून वर्षानुवर्षे परतफेड न करणारे संस्थेचे काही सभासद आहेत. या सभासदांची थकबाकीची यादी फलकावर प्रसिध्द करुन अशा सभासदांकडून कर्ज वसुलीसाठी कडक कारवाई करणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
यावेळी माजी उपसरपंच कान्हा खंडागळे यांनी संस्थेच्या मयत सभासदास २०१४ साली संस्थेने वेळोवेळी दिलेल्या कर्जाचा वसुल न होताच पुन्हा पुन्हा कर्ज दिलेले आहे. तसेच या संस्थेचा राजीनामा व कर्जफेड न करता दुसऱ्या संस्थेच्या सभासद होवून कर्जाचा लाभघेतला आहे. त्या सभासद मयत झाल्यानंतर त्यांच्या वारस नोंदी लावून वारसांनीही त्या क्षेत्रावर थकबाकी असताना पुन्हा कर्ज घेतले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होणे व कारवाई करणे,चेअरमन व संचालक बॉडीची जबाबदारी असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
कारेगाव भागचे संचालक शिवाजी शिंदे यावेळी म्हणाले. मयत समिंद्रा दगडू नाईक प्रकरण काय ही सविस्तर सभासदांना सांगा ,कर्जमाफी योजनेतील नियमीत कर्जफेडकरणाऱ्याशेतकऱ्यांनाही २ लाखाचे प्रोत्साहन अनुदान मिळाले पाहिजे तसा ठराव करुन तो वरिष्ठांकडे पाठवावा,अशी मागणी केली. दुष्काळी परीस्थिती असल्याने खरीप उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे कर्ज वसुलीचा तगादा करु नये.
माजी उपसरपंच राजेंद्र कोकणे, म्हणाले गेल्या २०१९ च्या कर्जमाफी योजनेत पात्र असलेल्या ११२ कर्जदार सभासदांना जाणुनबुजून डावलले गेल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्याबाबत त्या थकीत शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत,
ज्येष्ठ नेते विष्णुपंत खंडागळे म्हणाले. क.म. पत्रकात बदलत्या हवामानानुसार पिकांचा पटर्न बदलुन फळबागासाठी कर्ज उपलब्ध करुन द्यावे. संस्थेने केवळ कर्ज वाटप न करता शेतकऱ्यांना इतर सुविधा देण्यासाठी प्रयत्न करावेत,
यावेळी माजी सरपंच चित्रसेन रणनवरे, प्राचार्य जयकर मगर, रामेश्वर आरगडे, अण्णासाहेब दाभाडे यांनी मौलीक सूचना मांडल्या.
याप्रसंगी संस्थेचे माजी चेअरमन, एकनाथ पटारे, रोहिदास बोडखे, विजय कोकणे, देवदान रणनवरे, प्रा. दिलीप कोकणे, सुधीर मगर, पाराजी पटारे, भैय्या पठाण, रावसाहेब वाघुले, संजय पटारे, सुनिल बोडखे, भाऊसाहेब पटारे, अनिल कोकणे, भाऊसाहेब कोकणे, गजानन कोकणे, , दादासाहेब कोकणे, अप्पासाहेब रणनवरे, पोपटराव पटारे, विकास मगर, बबन रणनवरे, आबासाहेब दुस, सचिव रामनाथ ब्राम्हणे, रघुनाथ शेळके, रवी शिरसाठ, विठ्ठल बनकर, संजय ब्राम्हणे उपस्थित होते. अहवाल वाचन रवी शिरसाठ यांनी केले. सूत्रसंचालन संस्थेचे संचालक अविनाश लोखंडे यांनी केले. विषय पत्रिकेवरील सर्व अकरा विषय एकमताने मंजुर करीत सभा खेळीमेळीत पार पडली.
चौकट-सन २०१९ च्या कर्जमाफी योजनेत पात्र असतानाही जाणीवपूर्वक ११२ कर्जदार सभासदांना कर्जमाफी योजनेच्या लाभापासून दूर ठेवले गेले आहे. या शेतकऱ्यांना अत्ताच्या कर्जमाफी योजनेचाही लाभ देण्यात आलेला नसल्याने हे सर्व शेतकरी आजही थकबाकीत असल्याने त्यांना सोसायटीकडून कर्जाचा लाभ मिळत नसल्याने अडचण निर्माण झालेली आहे. सोसायटी व बँक प्रशासनाकडून या संस्थेच्या कर्जदार सभासदांना टाळले गेले आहे. या कर्जमाफीत तरी या ११२ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवून देण्यासाठी विद्यमान संचालक मंडळाने प्रयत्न करावेत अन्यतः याबाबत संभाजीनगरयेथे हायकोर्टात याचिका दाखल करण्यात येईल, अशी संतप्त प्रतिक्रिया संस्थेचे माजी संचालक अनिल यशवंत कोकणे यांनी वार्षिक समेत व्यक्त केली.
0 Comments