टाकळीभान प्रतिनिधी-टाकळीभान पोलीस दूरक्षेत्रा समोरून बेकरी व्यवसायकाचे 95 हजार रुपये मालवाहतूक गाडीतून चोराने चोरून नेले,
श्रीरामपूर येथील हिंदुस्तान बेकरीचा माल मालवाहतूक मॅजिक नंबर एम एच 12 Q W-00 37या गाडीतून चालक अब्बास पठाण हे बेकरीचा माल घेऊन औरंगाबाद येथे गेले होते, माल देऊन परत येत असताना, सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान टाकळीभाने येथे टाकळीभान पोलीस दूरक्षेत्रासमोर गाडी थांबून, चहा पिण्यासाठी गेले असता, तीन महिला व एक पुरुष या चोरांनी गाडी ठेवलेले मालाचे पैसे 95 हजार घेऊन पसार झाले,
ड्रायव्हरच्या चहा पिऊन गाडीत आल्यावर त्याच्या लक्षात आल्याने पैसे चोरीला गेले, तोपर्यंत तीन महिला एक पुरुष पसार झाले, टाकळीभानचे पोलीस मित्र बाबा सय्यद व गाडीचे ड्रायव्हर हे चोर गेले त्या मार्गाने गेल्या असतात दिसून आले नाही, त्यानंतर श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनची पी आय अरुण धनवटे व पोलीस कर्मचारी येऊन चोराचा तपास सीसीटीव्हीचे आधारे घेत आहे, परी डी,वाय,एस,पी, श्रीमती कल्पना पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत आहे ,
0 Comments