सध्या देवी आदिशक्ती दुर्गामाता आणि तिच्या नऊ रूपांच्या भक्तीचा शारदीय नवरात्र उत्सव सर्वत्र सुरू आहे. अशा या शिव आणि आदिशक्तीच्या भक्तीचा हा उत्सव सर्वांनाच एक अध्यात्मिक आणि आत्मिक शक्ती देणारा असा असतो. म्हणूनच या कालावधीत दुर्गे मातेची उपसना ही मोठी फलद्रुपी ठरते. वर्षात चार नवरात्री येतात . आषाढ व माघी नवरात्रीमध्ये दशमहाविद्यांची तर चैत्र व शारदीय नवरात्र उत्सवामध्ये नऊ दुर्गा मातेचे उपासना केली जाते. असे मत श्री नर्मदेश्वर सेवाधामचे महंत संन्याशी आत्माराम गिरीजी महाराज यांनी व्यक्त केले आहे.
राहाता तालुक्यातील सावळीविहीर वाडी येथील रामराज्य प्रतिष्ठान आयोजित नवरात्रौउत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे. सातव्या माळेला सायंकाळी महंत आत्मारामगिरी महाराजांच्या हस्ते आरती झाल्यानंतर त्यांचा प्रतिष्ठानच्या वतीने रावसाहेब एखंडे यांनी शाल श्रीफळ देऊन सन्मान केला. नंतर झालेल्या प्रवचनात महंत आत्मारामगिरीजी महाराज यांनी उपस्थितांना अध्यात्मिक मार्गदर्शन करताना सांगितले की, नवरात्र हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण असून सध्या शारदीय नवरात्र उत्सव सुरू आहे. शारदिय नवरात्रीत नवदुर्गा मातेची पूजा, उपासना केली जाते. पहिल्या दिवशी पर्वतराजा हिमवानाची कन्या असणाऱ्या शैलपुत्रीची पूजा केली जाते तर दुसऱ्या दिवशी तपश्चर्या, त्याग, वैराग्य आणि सदाचाराची देवी असणाऱ्या ब्रह्मचारीणीची उपसना केली जाते. तिसऱ्या दिवशी मस्तकावर अर्धचंद्र व घंटेचा नाद करणारी, शांती आणि वीर्य व पराक्रमाचे प्रतीक असणाऱ्या श्री. चंद्रघंटा देवीची पूजा केली. जाते. चौथ्या दिवशी आपल्या मंद आशाने संपूर्ण ब्रह्माची निर्मिती करणाऱ्या आदिशक्ती कुष्मांडा दुर्गा मातेची तर पाचव्या दिवशी भगवान कार्तिकेयाच्या (स्कंद) माता, मातृत्व आणि स्नेहाचे प्रतीक असणाऱ्या स्कंद मातेची पूजा केली जाते, सहाव्या दिवशी ऋषी कात्यायनांच्या आश्रमात जन्मलेली, युद्ध आणि धैर्याची देवी कात्यायनीची पूजा होते. तर सातव्या दिवशी अज्ञान, भीती आणि वाईट शक्तींचा नाश करणारी रौद्र रूपधारी देवी कालरात्री दुर्गा मातेची पूजा केली जाते. आठव्या दिवशी अत्यंत गोरा वर्ण असणारी, शुद्धता, पवित्रता आणि शांतीची देवी. असणाऱ्या महागौरीची तर नवव्या दिवशी सर्व प्रकारच्या सिद्धी आणि ज्ञान प्रदान करणारी देवी श्री सिद्धदात्री दुर्गा मातेची उपासना केली जाते. अशाप्रकारे नऊ दुर्गांमातेचीं या काळात उपासना केली जाते. असे सांगत या या विश्वाचा निर्माता ब्रह्म पालन करता विष्णू व संहारक शिव आहे. अशा या देवतांनाही जी शक्ती निर्माण झाली आहे. ती ही आदिशक्ती आहे. अनादी अंबिका भगवती आहे. ती सकल शिघ्र ठाव घेणारी माता आहे. म्हणूनच आपण तिला आई जगदंबा माता म्हणतो. नवदुर्गा, 64 योगिनी, दस महाविद्या आहेत. 51 शक्तीपीठे आहेत . असा हा देवींचा एक परिवार आहे. 64 योगिनी मध्ये नर्मदा माईचेही नाव आलेले आहे. असे सांगत आज सातवी माळ असून आज दुर्गा मातेच्या काल रात्री शक्तीची उपासना होत आहे. रात्र म्हणजे अंधार व वहा जीवनातील अंधार दूर करून प्रकाशाकडे जाण्यासाठी या
श्री.कालरात्री शक्तीची उपसना महत्त्वाचे आहे. कोणतेही उपासना पूजा आराधना करताना बीज मंत्र महत्वाचा आहे. सर्व मंत्र्यांचा बीज मंत्र हा राजा आहे. मुखी नाम, हाती मोक्ष, अशी भक्तांना प्राप्त होते ईश्वरी साक्ष , पण मी करत असताना जसे चंद्राकडे चंद्रिका शंभू तेथे अंबिका तसेच संत, गुरु तेथे विवेक असला पाहिजे. गुरूला शरण जाऊन नामस्मरण चिंतन यासारखे लवकर ईश्वर प्राप्तीसाठी, आत्मबोध होण्यासाठी दुसरे कोणते साधन नाही. आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा असे म्हटले आहे. अशी ही आदिनाथ शिव व आदिशक्ती दुर्गा मातेची या नवरात्र काळातील उपासना ही मोठी फलदायी भक्ती ठरते. असे म्हणतात आत्मारामगिरीजी महाराज यांनी यावेळी सांगितले.व
हर हर महादेव घरघर महादेव!! नर्मदे हर जिंदगी भर!! आणि बम बम भोले, मस्ती मे डोले!! असा जयघोष करत रामराज्य प्रतिष्ठान नवरात्र मंडळाच्या सर्वांना व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. प्रवचनानंतर रावसाहेब एखंडे यांनी प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती देत येथे नऊ दिवस विविध कार्यक्रम घेण्यात आले . त्यांना साई सदाफळ व रामराज्य प्रतिष्ठानच्या वतीने बक्षिसे देण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर हभप मनोज महाराज बिडवे, बाळासाहेब जपे, कैलास सदाफळ, राजेंद्र गडकरी, शिवाजी आगलावे, विठ्ठल आगलावे, शेलार काका, सुनील आगलावे, गणेश कापसे, रवी कापसे, सुभाष पोपळघट, आदींचा शाल देऊन सत्कार केला. यावेळी रामराज्य प्रतिष्ठान नवरात्र उत्सव मंडळाचे किरण सावंत, नामदेव चव्हाण, सतीश कौशे, सचिन एखंडे, कैलास पगारे,आहिरे, आदींसह कार्यकर्ते , व परिसरातील महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमानंतर सर्व भाविकांसाठी खिचडी महाप्रसादाचा कार्यक्रम झाला..
सावळीविहीर वाडी येथील रामराज्य प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्र उत्सवात विविध कार्यक्रम!
0 Comments