लोणी (प्रतिनिधी)
राहाता तालुक्यातील लोणी येथील श्री वरद विनायक सेवाधामचे संस्थापक महंत उद्धव महाराज मंडलिक (नेवासेकर) यांना देवळाली प्रवरा येथील इच्छापूर्ती प्रतिष्ठानतर्फे राज्यस्तरीय धर्मभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
शिर्डी येथे नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात इच्छापूर्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष संपत महाराज जाधव, उपाध्यक्ष गणेश भांड, सचिव दत्ता गागरे, गोपाळ शिंदे यांच्या हस्ते महाराजांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व मानाचा फेटा देऊन सन्मानित करण्यात आले.
धार्मिक क्षेत्रातील कार्याचा गौरव म्हणून त्यांना राज्यस्तरीय इच्छापुर्ती गुणीजन गौरव या उपक्रमांतर्गत सन्मानित करण्यात आले. राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सर्व वारकारी संप्रदायातून तसेच समाजातील सर्वच स्तरातून उध्दव महाराज यांचे अभिनंदन होत आहे.
0 Comments