टाकळीभान प्रतिनिधी- टाकळीभान येथील रमेश गिताराम तगरे यांना नूकतेच कारागृह विभागामध्ये बजावलेल्या प्रशंसनीय सेवेबद्दल पदक व सन्मानचिन्ह सन्मानीत करण्यात आले. या निमित्ताने भारतीय जनता पार्टी व महादेव यात्रा कमिटी वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला,
यावेळी सत्काराला उत्तर देताना तगरे म्हणाले की,26 वर्षा पासून नोकरी करीत असताना , निस्वार्थपणे सेवा केली, त्याचे फळ आज मला मिळाले,असून गावाने माझा सत्कार केला त्याबद्दल मी गावाचा सदैव ऋणी राहील, असे उदगार तगरे यांनी व्यक्त केले
यावेळी भारतीय जनता पार्टीचे वतीने तगरे यांचा सत्कार,उपसरपंच कानोबा खंडागळे, युवा नेते भाऊसाहेब पवार तर मेजर विनोद रणनवरे , गणेश कोकणे, श्रीरामपूर एसटी आगाराचे आग्रहाचे संघटनेचे अध्यक्ष अमोल पटारे, ज्येष्ठ पत्रकार दिलीप लोखंडे, शामराव खरात, अमोल चितळे, प्रशांत कोकणे ,अक्षय कोकणे,
तसेच महादेव यात्रा कमिटीच्या वतीने तगरे यांचा सत्कार राष्ट्रवादी किसान सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोकणे, काकासाहेब डिके यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी माजी सरपंच भाऊसाहेब हिरे, धावपटू भाऊसाहेब गव्हाणे, गजानन कोकणे, बंडूपंत कोकणे, विष्णुपंत पटारे, अशोक शिंदे, राजेंद्र जाधव, आदि उपस्थित होते,
0 Comments