दुष्काळाच्या सावटाखाली अंजनाई गोशाळेत पारंपारिक पद्धतीने बैलपोळा सण उत्साहात साजरा--



दिलीप शिंदे 
सोयगाव दि.११-- क्रांती जनहित बहुउद्देशीय विकास संस्था आमखेडा ता. सोयगाव संचलित अंजनाई गोशाळेत दि.१० गुरुवारी पारंपारिक पद्धतीने बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेच्या संचालिका पद्माबाई शिंदे यांच्याहस्ते गोमाता व बैलांचे पूजन करून गोड नैवद्याचा घास भरविण्यात आला.



 दरम्यान बैलपोळ्याच्या निमित्ताने गोवंशाचे पूजन करून दुष्काळाच्या सावटाखाली पारंपरिक पद्धतीने पोळ्याचा सन साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संदिप इंगळे यांनी ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक असलेल्या या उत्सवाचे महत्त्व अधोरेखित केले.यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष ईश्वर इंगळे,सचिव दिलीप शिंदे, संचालक अनिल लोखंडे,अशोक ढगे, ज्ञानेश्वर गाडेकर, संचालिका रुपाली लोखंडे, मीना गाडेकर, छायाबाई पवार, सुमनबाई गव्हाणे, गोशाळेचे कर्मचारी ज्ञानेश्वर जाधव, अनिता जाधव, अशोक सोनवणे, रामा बोडखे आदींसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments