दुष्काळाच्या सावटामुळे बैलपोळ्याच्या उत्साहावर विरजण; लोणी बाजारात खरेदीसाठी शेतकऱ्यांची तुटपुंजी गर्दी

रुपाली भालेराव 

लोणी :शेतकऱ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि लाडका सण असलेल्या बैलपोळ्याच्या पार्श्वभूमीवर लोणी बाजारपेठेत बैलपोळा साहित्याच्या खरेदीसाठी ग्राहक व विक्रेते दाखल झाले होते. मात्र, यंदाच्या वर्षी दुष्काळाच्या सावटामुळे शेतकऱ्यांमध्ये सणाचा उत्साह काहीसा कमी झाल्याचे चित्र बाजारात स्पष्टपणे पाहायला मिळाले.
बैलपोळ्यानिमित्त बैलांसाठी लागणारे सजावटीचे साहित्य, रंग, गोंडे, झुली, दोर, तसेच पूजेचे साहित्य विक्रीसाठी बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाले आहे. ग्राहक आणि विक्रेत्यांमध्ये खरेदी-विक्रीचा सोहळा दिसत असला, तरी दरवर्षीच्या तुलनेत 'शेतकरी राजा' मात्र बाजारात खूपच कमी प्रमाणात दिसून आला.

 पावसाने पाठ फिरवली त्याचा थेट शेती व्यवसायावर गंभीर परिणाम झाला असून, त्याचा थेट ताण आणि परिणाम सणाच्या खरेदीवरही स्पष्टपणे जाणवत आहे.
या सर्व परिस्थितीमुळे बैलपोळा सणाची पारंपरिक भव्यता आणि उत्साह कायम असला, तरी ढासळलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या उत्साहावर आणि खरेदीवर मोठी मर्यादा आल्याचे दिसून आले आहे. लोणी बाजारात खरेदीसाठी शेतकऱ्यांची तुटपुंजी गर्दी झाली असून, एकूणच ग्राहक आणि विक्रेत्यांमध्येही पूर्वीसारखा उत्साह कमी झाल्याचे या निमित्ताने समोर आले आहे.

Post a Comment

0 Comments