दिलीप शिंदे
सोयगाव दि.०३-- सोयगाव तालुक्यातील बहुलखेडा शिवारात दि.०२ बुधवारी रात्रीच्या सुमारास एका शेतात पुरुष जातीचा ४५ वर्ष वयाचा मृतदेह आढळून आल्या ची घटना घडली आहे घटनेची माहिती मिळताच सोयगाव पोलिसांचे पथक रात्री बारा वाजता घटनास्थळी जाऊन रात्रीच्या अंधारात पोलिसांनी पहाटे चार वाजेपर्यंत या मृतदेहाची ओळख पटविण्यात यशस्वी झाले आहे. याप्रकरणी गुरुवारी सायंकाळी पाच वाजता सोयगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार कुजलेल्या अवस्थेत बहुलखेडा शिवारातील गट क्रमांक १४६ सादीक अब्दुल रहेमान देशमुख यांच्या शेतात ४५ वर्ष वयोगटातील एक मृतदेह आढळून आला होता परंतु या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी सोयगाव पोलिसांना शर्थीचे प्रयत्न करून अखेर सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर गोरे यांनी तातडीने बुधवारी रात्रीच तपास चक्रे फिरवून सदर मृतदेहाची ओळख तीन तासात पटविली सदर मृत तरुण गेल्या पाच दिवसापासून बहुलखेडा गावातून बेपत्ता असल्याचे पोलिसांना कळल्या वर बहुलखेडा गावात रात्रीच्या सुमारास चौकशी करून तो मृत तरुण दगडू बुऱ्हाण तडवी (वय -४५) रा बहुलखेडा असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान घटनास्थळी दुपारी तीन वाजता न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा पथकाला पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजित काईगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनकर गोरे,उपनिरीक्षक गजानन आरेकर, जमादार ज्ञानेश्वर दांडगे,गजानन दांडगे,अजय कोळी,आदी पुढील तपास करत आहे.
प्रतिनिधी.दिलीप शिंदे यांच्या कडून मिळालेल्या माहितीनुसार बातमी प्रसिद्ध करण्यात आली
0 Comments